येथील प्राचीन श्री रामेश्वर मंदिरात गुरुवारी सकाळी ५ वाजता नगराध्यक्ष सतीश तायडे यांनी सपत्नीक महादेवाची महापूजा केली. या वेळी मंदिर समितीचे सदस्य उपस्थित होते.
सिंदखेड राजा येथील श्री रामेश्वर मंदिर अति प्राचीन आहे. अकराव्या शतकात हेमाद्री राजाने या मंदिराची निर्मिती केल्याची माहिती आहे. तर श्री राम यांच्या हाताने येथील शिवलिंग स्थापन झाल्याची आख्यायिका आहे. महाशिवरात्रीनिमित्त मंदिरात गर्दी होऊ नये, यासाठी तहसीलदारांनी मंदिर समितीला पत्र देऊन कोरोना नियम पाळण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार महाशिवरात्रीला सकाळपासूनच पोलीस आणि स्वयंसेवकांनी मंदिरात गर्दी होणार नाही याची काळजी घेतली. भाविकांचे पूजा - अभिषेक आज पूर्ण बंद ठेवण्यात आले होते. भाविकांनीही कोरोनाचे नियम पाळून देवाचे दर्शन घेतले.