शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
3
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
4
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
5
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
6
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
7
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
8
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
13
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
14
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
15
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
16
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
17
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
20
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम

एकनाथ महाराज पुण्यतिथी महोत्सवासाठी आलेल्या भाविकांना लोणी गुरवमध्ये चक्रीवादळाचा फटका!

By अनिल गवई | Published: May 26, 2024 8:55 PM

बुलढाण्यात भाविक अडकले; चार ते पाच वाहनांवर उन्मळून पडली झाडे

खामगाव: तालुक्यातील लोणी गुरव येथे श्री संत एकनाथ महाराजांच्या पुण्यतिथी सोहळ्यासाठी आलेल्या भाविकांना रविवारी सायंकाळी आलेल्या चक्रीवादळाचा चांगलाच  फटका बसला. यावेळी झाडे उन्मळून पडल्याने चार ते पाच कारचे नुकसान झाले. वाहतूक कोंडी झाल्याने हजारो भाविक विविध रस्त्यांवर अडकून पडले होते.

खामगाव तालुक्यातील लोणी गुरव येथे सुमारे दोनशे वर्षांची परंपरा असलेला एकनाथ महाराज पुण्यतिथी उत्सव साजरा करण्यात येतो. रविवारी पुण्यतिथी महोत्सवानिमित्त आयोजित श्रीमद् भागवत सप्ताहाची सांगता होती. गत सप्ताहभरापासून आयोजित धार्मिक उत्सवात भाविकांची मोठी मांदियाळी होती. दरम्यान, रविवारी महाप्रसादासाठी मोठ्यासंख्येने भाविक येथे जमले होते. सायंकाळी अचानक आलेल्या  पावसासह चक्रीवादळामुळे लोणी गुरव येथे आलेल्या पाहुणे मंडळीच्या चार ते पाच गाड्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. परिसरात ठिकठिकाणी मोठमोठे वृक्ष उन्मळून पडल्यामुळे तसेच घरावरील टिनपत्रे उडाल्याने मालमत्तांचे मोठे नुकसान झाले. त्याचवेळी किन्ही महादेव, नागापूर परिसरात चक्रीवादळामुळे मोठे नुकसान झाले.

चांदे कॉलनीत कारवर कोसळला वृक्ष

शहरातील चांदे कॉलनीतील संत गजानन महाराज मंदिर परिसरात एका उभ्या कारवर वृक्ष पडल्याची घटना घडली. शेगाव रोडवर खामगाव येथून शेगाव येथे जात असलेल्या एमएच १४ २१९६ क्रमाकांच्या एसटीबसवर टपरी उडाली होती.  त्याचवेळी संजिवनी कॉलनीतील काही घरांवरील टिनपत्रे उडाली.

शहर पोलीस स्टेशनजवळ कोसळले झाड

शहर पोलीस स्टेशनच्या आवारातील झाड पोलीस वसाहतीच्या दिशेने कोसळले. त्याचवेळी आणखी एक झाड पोलीस स्टेशनच्या आवारातच पडल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगावcycloneचक्रीवादळ