सिंदखेड राजा : आक्षणासह विविध मागण्यांसाठी धनगर समाजाने साेमवारी सिंदखेड राजा येथील तहसील कार्यालयात मेंढ्यासह धडक दिली़ तसेच तहसीलदारांच्या मार्फत विविघ मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना दिले़
धनगर जमातीला अनुसूचित जमाती आरक्षण प्रमाणपत्र मिळावे, ओबीसी आरक्षणातील घुसखोरी रोखावी, जातीनिहाय जनगणना करण्यात यावी, टाटा संस्थेने केलेला अभ्यास अहवाल जाहीर करावा, एक हजार कोटींच्या योजनांची अंमलबजावणी करण्यात यावी, धनगर कार्यकर्ते शेखर बंगाले यांना झालेल्या मारहाण प्रकरणी मंत्री विखे यांनी माफी मागावी, अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त सरकारने कृती कार्यक्रमाची घोषणा करावी, सरकारने धनगर जमातीच्या अभ्यासू लोकांसोबत चर्चा करावी, धनगर व आदिवासी समाजाचे प्रश्न एकाच मंचावर समजून घ्यावे, मेंढपाळ यांना चराई पास देण्यात यावेत अशा विविध मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या.यावेळी समाजातील ज्येष्ठ मंडळी फकिरा जाधव, बाळू म्हस्के, बाबासाहेब म्हस्के, बाळासाहेब म्हस्के, सुनील म्हस्के, भुजंग जाधव, किशोर म्हस्के, काशिनाथ म्हस्के, कोंडीबा जाधव, शांताराम म्हस्के, गंगाधर कुंडकर, गणेश म्हस्के, रामदास जाधव यांच्यासह समाजातील युवा,महिला,नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.