ढोरपगाव : परिसरात यावर्षी झालेल्या भरपूर पावसामुळे ढोरपगाव लघु प्रकल्प शंभर टक्के भरला असून पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न मिटला आहे.दमदार पावसामुळे सिद्धगंगा नदी वाहती झाल्याने या पसिरातील विहिरींची पाणी पातळीही वाढली आहे. ढोरपगाव प्रकल्प भरल्याने वडजी भेंडी, भालेगाव, काळेगाव, पोरज परिसरातील शेतीला याचा मोठा फायदा होणार आहे. पाण्याचा प्रश्न सुद्धा मिळणार आहे. गत दोन वर्षांपासून कमी पर्जन्यमानामुळे हा लघु प्रकल्प उन्हाळ्यात कोरडा पडला होता. मात्र यावर्षी झालेल्या सततच्या पावसाने प्रकल्प शंभर टक्के भरला असून पाण्याचा विसर्ग सुरू झाला. यामुळे शेतकºयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सिध्दगंगा नदी वाहती झाल्याने नदीकाठच्या शेतकºयांना याचा मोठा फायदा झाला आहे. दरम्यान ढोरपगाव प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग होत असल्याने नदी काठावरील गावातील नागरिकांनी सावधानता बाळगावी, असे आवाहनही पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता लोकेश बोबंटकार, विजय झांबरे यांनी केले आहे. (वार्ताहर)
ढोरपगाव लघु प्रकल्प शभंर टक्के भरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 6:00 PM