शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
3
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
4
"अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
5
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
6
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
7
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
8
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
9
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
10
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
11
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
12
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
13
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न
14
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी
15
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
16
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
17
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
18
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
19
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
20
Gold Silver Price Today 26 November: सोनं ४,२३० आणि चांदी १०,२४० रुपयांनी झालं स्वस्त; आता इतक्या किंमतीत मिळतंय १० ग्राम सोनं

मधुमेहाच्या रुग्णांना ‘कोरोना’ संसर्गाची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2020 10:34 AM

संसर्ग टाळण्यासाठी मधुमेहाच्या रुग्णांना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांकडून देण्यात येत आहे.

- योगेश देऊळकार लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : मधुमेहाच्या रुग्णांची रोगप्रतिकारक क्षमता कमी असते. यामुळे या आजाराच्या रुग्णांना ‘कोरोना’ संसर्गाची सर्वाधिक भीती आहे. संसर्ग टाळण्यासाठी मधुमेहाच्या रुग्णांना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांकडून देण्यात येत आहे.सध्या ‘कोरोना’बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यातही हा आकडा २१ वर पोहचला होता. यापैकी एकाचा मृत्यू झाला असून ७ रुग्णांचे अहवाल निगेटीव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. जगभरात आतापर्यंत ‘कोरोना’मुळे झालेल्या मृतकांमध्ये मधुमेह व तत्सम आजाराच्या रुग्णांची संख्या सर्वात जास्त आहे. या पृष्ठभूमीवर मधुमेह असलेल्या रुग्णांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. कारण इतर रुग्ण किंवा निरोगी व्यक्तींच्या तुलनेत या रुग्णांची रोगप्रतिकारक क्षमता अतिशयक कमी असते. त्यांना प्रादुर्भावाचा धोका मोठ्या प्रमाणात संभवतो. हा धोका टाळण्यासाठी या रुग्णांनी साधा ताप, सर्दी किंवा खोकला आल्यास तत्काळ औषधोपचार घ्यावा. मधुमेह आटोक्यात आहे किंवा नाही याची खातरजमा करावी. मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी डॉक्टरांनी ठरवून दिलेले औषध न चुकता नियमितपणे घेत पथ्य पाळणेही महत्त्वाचे ठरते. सध्या ‘लॉकडाउन’मुळे मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडणे शक्य नसले तरी घरातच ही प्रक्रिया करावी. नियमित व्यायाम, योगासन, प्राणायाम केल्यास मधुमेहाचे रुग्ण इतर रुग्णांपेक्षा तंदुरुस्त राहू शकतात. शक्यतो बाहेर पडू नये, अत्यावश्यक कामासाठी बाहेर गेल्यास कोणत्याही वस्तुला स्पर्श करू नये, बाहेरून आल्यावर हात साबणाने किंवा सॅनिटायझरने स्वच्छ धुवावे आदी बाबींची खबरदारी मधुमेहाच्या रुग्णांनी घ्यावी, असे आवाहन मधुमेह तज्ज्ञ डॉ. अशोक बावस्कार यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले.

५० पेक्षा जास्त वय असलेल्यांना अधिक धोकासध्याच्या धकाधकीच्या युगात मधुमेह हा आजार कोणत्याही वयोगटातील व्यक्तींना होऊ शकतो. मात्र तरुण रुग्णांच्या तुलनेत ५० पेक्षा जास्त वय असलेल्यांना या आजाराचा धोका अधिक असतो. अशा रुग्णांनी या गंभीर ‘कोरोना’ आजारापासून स्तत:चा बचाव करण्यासाठी सतर्क राहण्याची गरज आहे.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य