बसस्थानकावर हिरकणी कक्षाची उभारणी करणे गरजेचे असतानाही मेहकर बसस्थानकात हिरकणी कक्ष नसल्याने महिलांना अडचणी येत आहेत. मेहकर येथील बसस्थानकाचे काम अनेक महिन्यांपासून सुरू आहेत. जुन्या बसस्थानकामध्ये हिरकणी कक्ष होता. मात्र नवीन बांधकाम करायचे असल्यानेही जुने पूर्ण बांधकाम पाडण्यात आले आहे. मात्र दुसऱ्या जागेवर प्रवास करणाऱ्या महिलांना यांच्यासोबत लहान बाळ आहे, अशा महिलांकरिता हिरकणी कक्षाची उभारणी करणे अत्यंत गरजेचे होते. मात्र मेहकर बसस्थानकात हिरकणी कक्षाची उभारणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे महिला प्रवाशांना लहान बाळाला दूध पाजण्याकरिता अडचणी निर्माण होतात. या बाबींकडे व्यवस्थापकांचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. यासोबतच मेहकर येथील महिलांच्या शौचालयाची दुरवस्था झाली आहे. यामुळे महिला प्रवाशांना अनेक अडचणी निर्माण होत आहे.
बसस्थानकाच्या बांधकामात हिरकणी कक्ष हरपला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2021 4:34 AM