लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : काेरोना महामारीने जनजीवन ढवळून निघाले. अनेकांचे रोजगार गेले. अनेकांना प्राणसही मुकावे लागले. त्यात भरीस भर रस्त्यांवरील अपघातांतही अनेकांचा मृत्यू ओढावला आहे. आकडेवारीवर नजर टाकल्यास मरण स्वस्त झाले काय, असे वाटू लागले आहे.
गत दीड वर्षांपासून कोरोना महामारीने सर्वांना त्रस्त करून सोडले आहे. अनेकांचे जीवही कोरोना महामारीने गेले. संचारबंदी, लॉकडाऊन असले तरी रस्त्यावरील रहदारी कमी होऊन अपघात कमी होतील, असे वाटत होते. मात्र, गत काहीवर्षीच्या तुलनेत दाेन वर्षांत अपघात कमी झाले आहेत. मागील सहा महिन्यांत १९६ रस्ते अपघात झाले आहेत. यामध्ये १०० व्यक्तींनी या अपघातांत आपला जीव गमावला. गतवर्षी म्हणजे २९९ व्यक्तींनी जीव गमावला होता. २०१८ मध्ये ६४८ अपघात झाले हाेते. त्यामध्ये ३०४ जणांचा मृत्यू झाला हाेता तर ६२८ जण जखमी झाले हाेते. त्यामुळे, चालकांनी नियमांचे पालन करण्याची गरज आहे.
लॉकडाऊनमध्ये अपघात झाले कमी, पण...
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे केंद्र व राज्य सरकारने काहीकाळ संचारबंदीची घोषणा केली होती. त्यामुळे रहदारी कमी होऊन अपघात कमी होतील, असे वाटत होते. मात्र, लॉकडाऊन काळातही अपघातांची संख्या मोठी आहे. गत दीड वर्षांत रस्ते अपघातांत ३९९ जणांचा बळी गेला आहे. रस्त्यावर होणारे अपघात हा गंभीर विषय असून, अपघात कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत. नियमांचे पालन केल्यास अपघात टाळता येतात.
पायी चालणाऱ्या व्यक्तींनाही धोका
अपघात वाहनांमध्ये होत असला तरी पायी चालणाऱ्या पादचाऱ्यांनाही या अपघातांचा धोका आहे. रस्ता ओलांडताना किंवा रस्त्याच्या कडेला अज्ञात वाहनाने धडक दिल्याच्याही घटना घडल्या आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांनाही धोका असल्याचे समोर आले आहे.
मृतांमध्ये सर्वाधिक तरुणांचा समावेश
रस्ते अपघातात अनेकदा नियमांचा भंग होत असल्याचे दिसून येते. त्यात नियमांपेक्षा जास्त वेगाने वाहन चालविणे, मद्यप्राशन करणे, चुकीच्या साइडने वाहन चालविणे या बाबींचा समावेश असतो. ही चूक तरुणाई करत असल्याचे दिसते.
या ठिकाणी वाहने हळू चालवा
डाेणगावजवळील गाेहगाव फाटा, आरेगाव गाव फाटा येथे अपघात माेठ्या प्रमाणात घडले आहेत. त्यामुळे, वाहनधारकांनी या दाेन्ही मार्गावर वाहने हळू चालविण्याची गरज आहे.
वेग मर्यादाचे अनेक चालन पालन करत नसल्याने अपघात हाेत आहेत.
वाहने चालवताना चालकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. नियमांचे पालन केल्यास अपघात टळू शकतात. सजग राहून वाहने चालवावे.
-
वाहतूक नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. वाहतूक नियमांचे पालन केल्यास अपघात टाळता येऊ शकतात.
-