नीलेश शहाकार बुलडाणा, दि. २१- दररोज लागणार्या जीवनावश्यक वस्तूंमध्ये भेसळीचे प्रमाण वाढले असून, यामुळे दररोजच्या अन्नाबरोबर अक्षरश: विष घातल्या जात आहे. जिल्हा अन्न व औषध प्रशासनाकडून खाद्य वस्तूच्या दुकानांमध्ये महिनाभरात केलेल्या तपासणीत ही बाब उघड झाली आहे. यात खाद्यपदार्थांंंच्या ३१ नमुन्यांमध्ये भेसळ आढळून आली आहे. नागरिकांकडून प्राप्त तक्रारीच्या आधारे तसेच स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेत, सणासुदीच्या काळात अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाकडून तब्बल २८0 खाद्य व किरणामाल विक्री प्रतिष्ठानांमधील खाद्य वस्तूंचे नमुने घेत, त्यांची तपासणी करण्यात आली. यात ३१ वस्तूंच्या नमुन्यामध्ये भेसळ होत असल्याची बाब उघडकीस आली. हे सर्व नमुने अप्रमाणित घोषित करण्यात आले. मिठाईत सर्वाधिक भेसळसणासुदीच्या काळात मोठय़ा प्रमाणात मिठाई तयार करण्यात येते. मिठाई, दूध व किराणाचे २८0 दुकानांमधील २३८ खाद्य पदार्थांंंचे नमुने अन्न व औषध विभागाने तपासले असून, यामध्ये खाद्यतेलाचे पाच, दुधाचे सहा, तसेच सर्वाधिक मिठाईचे २0 नमुने, असे ३१ नमुन्यांमध्ये भेसळ आढळून आली. सर्व प्रकरण न्यायालयीन निर्णयासाठी दाखल आहे.खाद्यपदार्थ तपासणी प्रयोगशाळा नाही!तपासणीदरम्यान एखाद्या खाद्यपदार्थात भेसळ आढळून आली, तर त्याची तपासणी करण्यासाठी बुलडाणा अन्न प्रशासनाकडे स्वत:ची प्रयोगशाळा नाही. बर्यावेळा नमुने अमरावती व अकोला प्रयोगशाळेत पाठविले जातात. शिवाय विभागात मनुष्यबळ कमी असल्यामुळे कारवाई करताना बर्याच अडचणींना तोंड द्यावे लागते.हॉटेल, रेस्टॉरंट, स्विट मार्ट, किराणा दुकान व इतर अन्न पदार्थ विक्री करणार्या प्रतिष्ठानांवर आमच्या नियमित आकस्मिक भेटी असतात. त्यातून आम्ही पदार्थ व साहित्याचे नमुने घेऊन ते परीक्षणासाठी पाठवितो. दिवाळीनिमित्त अन्न प्रशासनाचे बाजारपेठेवर विशेष लक्ष आहे. शिवाय मिठाई खरेदी करताना नागरिकांनी जागृत रहावे.- गोंविद माहोरे अन्न अधिकारी अन्न व औषध प्रशासन, बुलडाणा
खाद्यपदार्थांच्या ३१ नमुन्यांमध्ये भेसळ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2016 2:38 AM