शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

बुलडाणा जिल्ह्यातील गुरूजींची नाळ जुळली डिजिटल युगाशी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 2:49 PM

राज्यातील बहुसंख्य शाळा डिजिटल होत आहेत. शिक्षकांनी सुद्धा यात उत्स्फुर्त सहभाग घेतला असून, जिल्ह्यातील १५५५ शाळा मोबाईल डिजीटल झाल्या आहेत. दरम्यान, शिक्षकानीही विद्यार्थ्यांच्या आकलन शक्तीला चालना देण्याच्या दृष्टीकोणातून सुमारे १०९ शैक्षणिक अ‍ॅप्स तयार केले आहेत.

ठळक मुद्देजिल्ह्यातील शिक्षकांनी बनवले १०९ ‘शैक्षणिक अ‍ॅप्स’ विद्यार्थ्यांचा अ‍ॅप्सवर अभ्यास

ब्रम्हानंद जाधवलोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : राज्यातील बहुसंख्य शाळा डिजिटल होत आहेत. शिक्षकांनी सुद्धा यात उत्स्फुर्त सहभाग घेतला असून, जिल्ह्यातील १५५५ शाळा मोबाईल डिजीटल झाल्या आहेत. दरम्यान, शिक्षकानीही विद्यार्थ्यांच्या आकलन शक्तीला चालना देण्याच्या दृष्टीकोणातून सुमारे १०९ शैक्षणिक अ‍ॅप्स तयार केले आहेत. मोबाईलच्या माध्यमातून त्याचा वापर करत विद्यार्थ्यांना मनोरंजनातून शिक्षण देण्याचा प्रयास जिल्ह्यात सुरू असल्याने डिजिटल युगाशी गुरूजींची नाळ जुळल्याचे दिसून येत आहे.जिल्हा परिषदेच्या शाळांनी आता कात टाकली आहे. अनेक शाळांनी आय.एस.ओ. मानांकन मिळविले आहे. तर काही शाळा आय.एस.ओ. मानांकनाच्या वाटेवर आहेत. शासानाच्या डिजिटल इंडीया या उपक्रमाचे वारे जिल्हा परिषद शाळेतही वाहू लागले असल्याने जि.प.च्या शिक्षकांनीही डिजिटल शाळा या संकल्पनेचे उत्स्फुर्तपणे स्वागत केले आहे. अनेक तरुण शिक्षकांनी स्वत: च्या मोबाईलवर अभ्यासपूर्ण वेबसाईची निर्मिती केली आहे. जिल्ह्यातील १ हजार ५५५ शाळा मोबाईल डिजिटल झाल्या असून त्यावर शैक्षणिक अ‍ॅप्स तयार करण्याचे प्रमाणही वाढले आहे. बदलणाºया तंत्रज्ञानाचा अभ्यास करून बुलडाणा जिल्ह्यातील शिक्षकांनीही एकाच महिन्यात सुमारे १०९ ‘शैक्षणिक अ‍ॅप्स’ तयार केले आहेत. त्यामध्ये बुलडाणा तालुक्यातील दोन, चिखली ४, देऊळगाव राजा २, मेहकर ७, खामगाव ६, संग्रामपूर ६, जळगाव जामोद ६, नांदूरा तालुक्यात ७६  असे  एकूण १०९ शैक्षणिक अ‍ॅप्स एकच महिन्यात शिक्षकांनी तयार केले आहेत. या शैक्षणिक अ‍ॅप्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आनंददायी पद्धतीने शिकविल्या जात आहे. शिक्षकांनी हे बदलते तंत्रज्ञान अवगत केल्याने त्याचा पुरेपुर उपयोग विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत आहे. जिल्हा परिषद शाळेत डिजिटलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना धडे मिळत असल्याने विद्यार्थी सुद्धा स्पर्धेच्या जगात टिकून राहण्यास मोठी मदत होणार आहे.  

शिक्षक व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुवरही अपडेटशिक्षक व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुक यावरही  अपडेट झाले आहेत. व्हॉट्स अ‍ॅपवर जिल्ह्यातील  शिक्षकांचे जवळपास १० ते १२ ग्रृप आहेत. यामुळे शैक्षणिक घडामोडी, प्रयोग, उपक्रमशील शाळा व शिक्षक इत्यादींची माहिती अद्ययावत स्वरुपात शिक्षकांना वेळीच मिळत आहे.     असे चालते शिक्षणशैक्षणिक अ‍ॅप्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या शैक्षणिक संकल्पना स्पष्ट करून दिल्या जात आहेत. विद्यार्थ्यांना स्वर, व्यंजने, पाढे, गणीतातील सुत्रे आॅडीओ क्लिप एैकवल्या जात आहे. तसेच विज्ञानाच्या विविध प्रयोगांचे व्हिडीओ दाखवून विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी आवघड निर्माण केली जात आहे. इतीहासातील घटनाक्रमही  विद्यार्थ्यांच्या सहज स्मरणात राहिल यासाठी, व्हिडीओ चित्रफितीद्वारे विद्यार्थ्यांना त्याची माहिती दिली जात आहे. 

टॅग्स :educationशैक्षणिकSchoolशाळा