लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : संत श्री गजानन महाराजांचे नामस्मरण, गण गण गणात बोतेचा जयघोष आणि टाळ-मृदंगाच्या गजरात मोठय़ा भक्तीभावात श्रद्धाभूमी ते प्रकटभूमी पायी दिंडी व पालखी सोहळ्याचे मंगळवारला शहरात आगमन झाले असता, मोठय़ा उत्साहात पालखीचे स्वागत करण्यात आले. सजवलेल्या रथात ठेवण्यात आलेल्या संत श्री गजानन महाराज यांच्या पादुकांच्या दर्शनासाठी भक्तांची रीघ लागली होती.धाड नाक्यावर सायंकाळी ६ वाजता पालखीचे आगमन झाले. शोभायात्रेच्या मार्गावर भाविकांनी फुलांचा सडा टाकला होता. पालखीवर भाविकांनी पुष्पवृष्टी केली. सद्गुरू श्री गजानन महाराज पायी दिंडी व पालखी सोहळ्यात औरंगाबाद येथील मंदिराचे विश्वस्त मंडळाचे प्रा.श्रीधर वक्ते सहभागी होते. नाक्यावर प्रा.जगदेवराव बाहेकर, रूपराव उबाळे यांच्यासह असंख्य भाविकांनी पालखीचे पूजन केले. हातामध्ये भगव्या पताका घेतलेले वारकरी, मुखाने श्री गजानन महाराजांचे नामस्मरण करत, तर विविध भजनी मंडळे टाळ-मृदंगांच्या तालात भजने म्हणत शोभायात्रेत सहभागी झाली. मुखाने सद्गुरूंचे नामस्मरण करत गजानन भक्त भक्तिभावात तल्लीन होऊन गेले होते. शोभायात्रेच्या मार्गावर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. चौक फुलांनी सजवण्यात आले होते. जागोजागी श्रींच्या पालखीचे भक्तांनी पूजन करून दर्शन घेतले. येथील अन्नपूर्णा मंगल कार्यालयात पालखीचा मुक्काम होता.
o्रद्धाभूमी-प्रगटभूमी पालखीचे धाड येथेही स्वागत‘गण गण गणात बोतेचा जयघोष’ करुन औरंगाबाद येथून गुरुवारी निघालेल्या o्रद्धाभूमी ते प्रगटभूमी या संतo्री गजानन महाराज यांचा पालखीचे सोमवारी धाड येथे आगमन झाले. बुलडाणा जिल्हय़ात या पालखीचे आगमन होताच गजानन भक्तांनी पालखीचे मोठय़ा उत्साहात स्वागत केले. सजवलेल्या रथातील o्री गजानन महाराजांच्या पादुका आणि मुखवटा ठेवलेली पालखी धाड येथे सायंकाळी दाखल झाली. येथून ढोल ताशांच्या गजरात पालखी वाजत गाजत शाळेच्या प्रांगणात पोहोचली. फटाक्यांची आताषबाजी, पालखी मार्गावर काढण्यात आलेल्या रांगोळ्या आणि पालखीवर करण्यात येणार्या पुष्पवृष्टीने वातावरण भक्तीमय बनले होते. जि.प.शाळेत पालखी दाखल झाल्यावर पुरुषोत्तम गुळवे, मधुकरराव गुळवे यांनी स्वागत केले. त्यानंतर आरती करण्यात आली. यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. पालखी सोहळ्यात सुमारे २५0 वारकरी सहभागी झाले असून, महिलांचा लक्षणीय सहभाग आहे.