बुलडाणा: लोकशाहीचा उत्सव असलेल्या २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत मतदारांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून व्यापक जाणीव जागृती उपक्रम हाती घेण्यात आला असून त्याअनुषंगाने दिव्यांग व्यक्तींच्या सहजसुलभ मतदान प्रक्रीयेसाठी विशेष लक्ष केंद्रीत करण्यात येत आहे. सोबतच दिव्यांगांना प्रथम प्राधान्याने मतदानाची संधी उपलबध करून देण्यात येणार आहे.लोकसभा निवडणूकीच्या दुस-या टप्प्यात अर्थात १८ एप्रिल रोजी बुलडाणा जिल्ह्यात मतदान होणर आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांचा आढावा घेण्यात आलेला असून दिव्यांग व्यक्तींसाठी मतदान केंद्रावर सहजसुलभ वातावरण निर्मिती व सुविधांवर सुध्दा भर देण्यात येत आहे. त्याअनुषंगाने सर्व मतदान केंद्रामध्ये मतदानासाठी येणा-या दिव्यांग व्यक्तींना मतदारांच्या रांगेत उभे राहून ताटकळत बसावे लागणार नाही. त्यांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था राहणार असून प्रथम प्राधान्याने मतदानाची संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर दिव्यांगासाठी व्हील चेअरसुध्दा उपलब्ध ठेवण्याचा प्रयत्न असून त्यासाठी ग्रामपंचायतमार्फत संपकार्साठी मोबाईल क्रमाकसुध्दा जाहीर केल्या जाणार आहेत. तसेच प्रत्येक मतदान केंद्रावर त्यांच्यासाठी उताररस्त्याची व्यवस्था सुध्दा करण्यात आली आहे.
भित्तीपत्रकाद्वारे जाणीव जागृतीजिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रावर दिव्यांगाचा मतांचा टक्का वाढावा व या प्रक्रीयेत त्यांना सहजसुलभ सहभागी होता यावे यासाठी विविध भित्तीपत्रकांव्दारे सुध्दा जाणीव जागृती करण्यात येत आहे. सोबतच मतदान केंद्रात त्यांना मदतीकरीता शालेय विद्यार्थी सुध्दा स्वयंसेवक म्हणून नियुक्त करण्यात येत आहे.