शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
3
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
4
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
5
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
6
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
7
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
8
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
9
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
10
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
11
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
12
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
13
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
14
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
15
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
16
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
17
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
18
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
19
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
20
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती

दिव्यांग विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 5:16 PM

निधीची तरतूद नसल्याने काही दिव्यांगाची शिष्यवृत्तीसाठी फरफट होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : दिव्यांग विद्यार्थ्यांना विशेष सहाय्य म्हणून समाजकल्याण विभागाकडून शिष्यवृत्ती देण्यात येते. मात्र जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाकडे निधीची तरतूद नसल्याने काही दिव्यांगाची शिष्यवृत्तीसाठी फरफट होत आहे.केंद्रसरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयांतर्गत कार्यरत असणाऱ्या राष्ट्रीय अपंग वित्तीय साहाय्यता संस्थेद्वारा दिव्यांग विद्यार्थ्यांना विशेष शिष्यवृत्ती देण्यात येतात. दिव्यांगासाठी विविध शिष्यवृत्तीच्या योजना राबवण्यिात येतात. परंतू समाज कल्याण विभागाकडे निधीची तरतूद नसल्याकारणाने काही विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली नसल्याचे दिसून येते. खामगाव येथील मातोश्री जयाबेन जीवनलाल मेहता सरस्वती विद्या मंदिरचा विद्यार्थी लिखित मनिष खेतान हा इयत्ता सहावीत असताना शाळेमार्फत सुरू प्रक्रिया पूर्ण करून शिष्यवृत्तीसाठी अर्ज केला होता.हा विद्यार्थी दिव्यांग असून त्याला संस्थेमार्फत सर्व प्रक्रिया पूर्ण करूनही दिव्यांग शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळाला नाही. त्यांनी जिल्हा परिषदच्या समाज कल्याण विभागाकडे अनेक वेळा पाठपुरवा केला. समर्ग शिक्षा अभियानकडेही अर्ज केला आहे. परंतू दोन वर्षापासून विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचीत आहे.

दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात येतो. परंतू निधीची तरतूद नसल्याने काहींना शिष्यवृत्ती दिल्या जाऊ शकत नाही. निधी मिळताच शिष्यवृत्तीचे वाटप केले जाईल.- मनोज मेरत,समाज कल्याण अधिकारी, जि. प. बुलडाणा.

टॅग्स :buldhanaबुलडाणाScholarshipशिष्यवृत्ती