शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
2
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
3
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
4
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
5
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
6
TATA IPL Auction 2025 Live: भारतीय खेळाडूंचा लिलावात बोलबाला; पंत, अय्यर अन् चहल यांच्यावर पैशांचा पाऊस
7
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
8
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
9
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
10
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
11
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
12
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
13
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
14
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
15
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
16
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
17
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
18
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...
19
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड

वडनेर प्राथमिक आरोग्य केंद्रात असुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2017 12:17 AM

नांदुरा : तालुक्यातील वडनेर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा  कारभार ढेपाळला असून हे केंद्र रामभरोसे सुरु असल्याचे दिसून येते.  या आरोग्य केंद्रावर वडनेर, चांदुरसह ३0 खेड्यातील जवळपास ५0  ते ६0 हजार लोकसंख्या आरोग्य सेवेसाठी अवलंबून आहे. पण  जवळपास एक महिन्यापासून येथे आरोग्य अधिकारी नसून सहाय्यक  डॉक्टरांच्या भरवशावर कारभार सुरू आहे. तसेच १0 दिवसांपासून  प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रूग्णवाहिकेत डिझेल नसल्याने ते उभे  आहे. हा सर्व प्रकार पंचायत समिती सदस्य योगिता गावंडे यांनी  उघडकीस आणला असून डॉक्टर नसेपर्यंत तेथून हलणार नसल्याची  भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यामुळे आरोग्य विभागाच्या सेवेचे  धिंडवडे पुन्हा निघाले आहेत.

ठळक मुद्दे३0 खेड्यातील जवळपास ५0  ते ६0 हजार लोकसंख्या आरोग्य सेवेसाठी अवलंबून आरोग्य केंद्रातील अनेक पदे रिक्त रुग्णवाहिका डीझेलअभावी उभीच!

लोकमत न्यूज नेटवर्कनांदुरा : तालुक्यातील वडनेर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा  कारभार ढेपाळला असून हे केंद्र रामभरोसे सुरु असल्याचे दिसून येते.  या आरोग्य केंद्रावर वडनेर, चांदुरसह ३0 खेड्यातील जवळपास ५0  ते ६0 हजार लोकसंख्या आरोग्य सेवेसाठी अवलंबून आहे. पण  जवळपास एक महिन्यापासून येथे आरोग्य अधिकारी नसून सहाय्यक  डॉक्टरांच्या भरवशावर कारभार सुरू आहे. तसेच १0 दिवसांपासून  प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रूग्णवाहिकेत डिझेल नसल्याने ते उभे  आहे. हा सर्व प्रकार पंचायत समिती सदस्य योगिता गावंडे यांनी  उघडकीस आणला असून डॉक्टर नसेपर्यंत तेथून हलणार नसल्याची  भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यामुळे आरोग्य विभागाच्या सेवेचे  धिंडवडे पुन्हा निघाले आहेत.वडनेर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी २0  दिवसांपासून सुटीवर असून त्यांच्या जागी तालुका आरोग्य अधिकारी  खंडारे यांनी तीन आयुर्वेदीक डॉक्टरकडे पदभार दिला असून प्रत्येकी  २ दिवस त्यांची पाळी नेमली आहे. परंतु अँलोपॅथी डॉक्टरच नसल्याने  रूग्णांवर उपचार होत नाहीत. तसेच डिलीव्हरी पेशंट, सर्पदंश, विष  प्राशनच्या घटनेतील पेशंटवर इलाज करणारे डॉक्टर नसल्याने त्यांना  मलकापूर उपजिल्हा रूग्णालयात पाठविण्यासाठी असलेल्या  रूग्णवाहीकेतही १0 दिवसांपासून डिझेल नाही. चार अटेंडंटची  नियुक्तीपैकी एकही हजर नसल्याने स्वत: पंचायत समिती सदस्य  योगिता गावंडे यांनी त्यांची कामे केली. तसेच सफाई नसल्याने स्वत:  साफसफाई केली असून रूग्णवाहीकेत स्वत: खर्च करून डिझेल  भरले आहे. तालुका आरोग्य अधिकारी यांच्याशी संपर्क केला असता  उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने गावंडे यांनी जिल्हा आरोग्य  अधिकारी पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन एस. यांना  वडनेर प्राथमिक आरोग्य केंद्रातील असुविधेबाबत माहिती दिली  असता त्यांनी योग्य उपाययोजना करण्याचे आश्‍वासन दिले आहे.  वडनेर येथे एकूण ४६ पदे मंजूर असून सध्या केवळ १५ ते १६  कर्मचारीच कार्यरत आहेत. काहींची बदली झाली तर काही  ट्रेनिंगसाठी गेले आहे. डिघी व वडनेर येथील उपकेंद्रावरील कार्यरत  आरोग्य सेवकांना संपर्क केला असता कोणी गाडी पंक्चर झाल्याचे  तर कोणी पत्नीला गावी सोडायला जात असल्याचे कारण सांगितले.  आरोग्य अधिकारी नसल्याने सदर केंद्रात कोणताही ताळमेळ नाही.

आरोग्य केंद्रातील अनेक पदे रिक्तसदर प्राथमिक आरोग्य केंद्रात ४६ पदे रिक्त असताना केवळ १५ ते  १६ पदे रिक्त आहेत. त्यात आरोग्य अधिकारीच गैरहजर असल्याने  कार्यरत कर्मचार्‍यांवर कोणाचाही वचक नाही. त्यामुळे त्यांचा  मनमानी कारभार सुरु आहे. तरी संबंधितांनी याकडे लक्ष देवून योग्य  त्या उपाययोजना कराव्यात.

वडनेर प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवेची परिस्थिती अ ितशय गंभीर असून आयुर्वेदीक डॉक्टरांच्या भरवशावर कारभार सुरु  आहे. आरोग्य अधिकारी नसल्याने डिलीव्हरी पेशंट, सर्पदंश सारखे  पेशंट मलकापूरला पाठवावे लागतात. पण त्याकरीता येथील  रूग्णवाहीकेत १0 दिवसापासून डिझेलही नाही. आपण स्वखर्चातून  डिझेल भरून दिले असून जोपर्यंत येथील आरोग्य सुविधा व्यवस्थित  होत नाही तोपर्यंत इथेच स्वत: काम करणार आहे.    - योगिता गावंडे, पंचायत समिती सदस्य नांदुरा.