लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हाधिकारी कार्यालय बुलडाणा व महात्मा जोतिबा फुले समाजकार्य महाविद्यालय बुलडाणा यांच्या संयुक्त विद्यमाने आपत्ती व धोके निवारण सप्ताहानिमित्त परिसंवादाचे आयोजन गुरुवारी करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला जम्मू येथील हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयातील प्रा.एन.ए. गायकवाड हे होते तर प्रमुख मार्गदर्शक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संभाजी पवार, एस.एस. पाटील यांनी नैसर्गिक व मानव निर्मित आपत्ती या संदर्भात विद्यार्थ्यांना अनुभवासह मार्गदर्शन केले. संभाजी पवार यांनी आपल्या जिल्ह्यातील आ पत्ती व्यवस्थापन संदर्भातील माहिती दिली. त्याचबरोबर एस.एस. पाटील यांनी छोट्या-छोट्या मानवनिर्मित आपत्ती, घरगुती आपत्ती, रोड दुर्घटना, गर्दीच्या ठिकाणची आपत्ती अशा वेगवेगळ्या व ऐनवेळी निर्माण होणार्या आपत्ती संदर्भात मार्गदर्शन केले व काय करावे या संदर्भात माहिती दिली. प्रा. संदीप मोठे यांच्या मार्गदर्शनाखाली एमएसडब्ल्यू भाग-१ च्या अंकुर गटाने हा परिसंवाद आयोजित केला होता. यामध्ये संदीप बोके, श्रीकृष्ण चव्हाण, विष्णू गव्हाणे, किरण इंगळे, अनिल वानखडे, पौर्णिमा तोडकर, श्वेता जाधव, मनीषा हिवाळे व सारिका खोडके यांनी परिसंवादात सहभाग नोंदविला. तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक साखरे, प्रा. बोकाडे, प्रा.डॉ. इंगळे, प्रा.डॉ. गेडाम, प्रा. ठोंबरे उपस्थित होते. प्रा. मोठे यांनी प्रास् ताविकेतून परिसंवादाचे महत्त्व तसेच आपत्ती व्यवस्थापनाचे महत्त्व विशद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप बोके याने तर आभार प्रदर्शन श्वेता जाधव हिने केले.
आपत्ती, धोके निवारण सप्ताहानिमित्त परिसंवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 11:33 PM
बुलडाणा: जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हाधिकारी कार्यालय बुलडाणा व महात्मा जोतिबा फुले समाजकार्य महाविद्यालय बुलडाणा यांच्या संयुक्त विद्यमाने आपत्ती व धोके निवारण सप्ताहानिमित्त परिसंवादाचे आयोजन गुरुवारी करण्यात आले होते.
ठळक मुद्देजिल्हा आपत्ती व्यवस्थापन व महात्मा जोतिबा फुले यांच्या संयुक्त विद्यमाने जम्मू येथील हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली