बुलडाणा : महावितरणने थकबाकीदार ग्राहकांविरुद्ध मोहीम उघडली असून त्यांतर्गत बुलडाणा मंडळातील पाणीपुरवठा वर्गवारीतील ९७७ ग्राहकांकडे ३६ कोटी ८३ लाख ४२ हजार रुपये थकबाकी आहे. त्यापैकी ६६९ पाणीपुरवठा योजनांचा या थकीत देयकापोटी वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. दरम्यान, २२ कोटी, ६६ लाख ९८ हजार रुपये थकबाकी प्रलंबीत आहे. बुलडाणा जिल्ह्यातील पाणीपुरवठा वर्गवारीतील एकूण ९७७ ग्राहकांकडे वीज देयकाचे ३६ कोटी ८३ लाख ४२ हजार रुपये एवढी थकबाकी प्रलंबित आहे, त्यापैकी बुलडाणा विभागात ३७३ पाणीपुरवठा योजनांकडे १३ कोटी ६० लाख ८ हजार रुपये थकबाकी होती. यापैकी २३१ योजनांकडे ७० कोटी ७ लाख २८ हजार रुपये थकीत असल्याने त्यांचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. खामगाव विभागात ३१७ पाणीपुरवठा योजनांकडे ११ कोटी ३७ लाख ५ हजार रुपये थकबाकी असून यापैकी १८७ योजनांचा पुरवठा खंडित करण्यात आला. त्यांच्याकडे ५ कोटी २० लाख ७४ हजार रुपये थकबाकी होती. मलकापूर विभागात २८७ पाणीपुरवठा योजनांकडे ११ कोटी ८६ लाख २९ हजार रुपये थकबाकी होती. पैकी २४५ योजनांचा पुरवठा खंडित करण्यात आला. त्यांच्याकडे १० कोटी ३४ लाख ८८ हजार रुपये थकबाकी होती. यासोबतच जिल्ह्यातील पथदिवे ग्राहकांकडे ४ कोटी ६० लाख ६७ हजार रुपये थकबाकी आहे. महावितरणने सर्वच वर्गवारीच्या थकबाकीदार ग्राहकांविरुद्ध ही मोहिम उघडली असून नियमानुसार थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे. यामुळे ग्राहकांना विजेपासून वंचित राहावे लागू शकते. थकबाकीदार ग्राहकांनी वीज बिलाचा भरणा वेळेत करून सहकार्य करण्याचे आवाहन अकोला परीमंडळाचे मुख्य अभियंता अरविंद भादीकर यांनी केले आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील ६६९ पाणीपुरवठा योजनांचा वीज पुरवठा खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 14:45 IST
बुलडाणा : महावितरणने थकबाकीदार ग्राहकांविरुद्ध मोहीम उघडली असून त्यांतर्गत बुलडाणा मंडळातील पाणीपुरवठा वर्गवारीतील ९७७ ग्राहकांकडे ३६ कोटी ८३ लाख ४२ हजार रुपये थकबाकी आहे. त्यापैकी ६६९ पाणीपुरवठा योजनांचा या थकीत देयकापोटी वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील ६६९ पाणीपुरवठा योजनांचा वीज पुरवठा खंडित
ठळक मुद्देपाणीपुरवठा वर्गवारीतील एकूण ९७७ ग्राहकांकडे वीज देयकाचे ३६ कोटी ८३ लाख ४२ हजार रुपये एवढी थकबाकी प्रलंबित आहे. यासोबतच जिल्ह्यातील पथदिवे ग्राहकांकडे ४ कोटी ६० लाख ६७ हजार रुपये थकबाकी आहे.महावितरणने सर्वच वर्गवारीच्या थकबाकीदार ग्राहकांविरुद्ध ही मोहिम उघडली असून नियमानुसार थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे.