यंदा पाऊस समाधानकारक होणार असल्याचे संकेत आहे. मात्र, खरीप हंगामातील पिकांसाठी बी बियाणे रासायनिक खते, कीटकनाशके खरेदी करण्यासाठी शेतकरी पीककर्ज व मागील वर्षीच्या पीकविम्याची रक्कम मिळविण्यासाठी मोठी कसरत करत आहेत. त्याबाबत राष्ट्रीयकृत बँकेचे अधिकारी उदासीन असल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. शेतकरी कर्जमाफी, शासनाने दिलेल्या उद्दिष्टानुसार राष्ट्रीयीकृत बँकांनी शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप करावे, अशी मागणी होत आहे. शेती मशागती कामाला वेग आला आहे; परंतु बी-बियाणे, खतांसाठी पीककर्जाची आवश्यकता असतानाही बँका कर्ज देत नाही. शेतकऱ्यांना उद्दिष्टानुसार पीककर्ज मिळत नसल्याने सध्या शेतकरी कोरोनाकाळात संकटात सापडला आहे. केंद्र शासनाच्या शेतकरी विरोधातील धोरणामुळे निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकरीवर्ग पूर्णत: कोलमडलेला आहे. कोरोनाकाळात शेतकऱ्यांना नाहक त्रास न देता सरळ व सोप्या पद्धतीने कर्जवाटप करण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी रियाज खा पठाण यांनी केली आहे.
शेतकऱ्यांना पीककर्ज त्वरित वाटप करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 4:26 AM