कोरोनाचे संकट दिवसागणिक अधिक गंभीर होत आहे. त्या पार्श्वभूमीवर शासनाने राज्यात लॉकडाऊन जाहीर केला आहे. केवळ अत्यावश्यक सेवा निर्धारित वेळेत सुरू ठेवण्यात आल्या आहेत. इतर सर्व प्रतिष्ठाने, खासगी सेवा बंद आहेत. मात्र, अशा परिस्थितीत पोलीस बांधव २४ तास सेवा देत आहेत. जीव धोक्यात घालून ते आपले कर्तव्य बजावत आहेत. कुटुंबाला वेळ देणेही पोलिसांना शक्य होत नाही. परंतु कुठलीच कुरबुर न करता त्यांचे काम सुरू आहे. बऱ्याचदा त्यांना स्वतःची पुरेशी काळजीही घेता येत नाही. नेमकी हीच बाब लक्षात घेऊन राजर्षी शाहू पतसंस्थेचे अध्यक्ष संदीप शेळके यांच्या मार्गदर्शनात सोमवारी पोलिसांना मास्क, सॅनिटायझर व इतर साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी ठाणेदार सारंग नवलकर, विभागीय व्यवस्थापक भागवत गव्हाणे, सतीश राजपूत, देऊळघाट शाखेचे व्यवस्थापक वैभव शेळके, शेख सादिक शेख रशीद, प्रवीण सुसर यांच्यासह पोलीस बांधव उपस्थित होते.
पोलिसांना मास्क, सॅनिटायझरचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 4:43 AM