शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

आता शहरी भागाच्या शाळेतील तांदूळ वितरण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 2:20 PM

लॉकडाउनच्या कडक नियमांमुळे सावध पवित्रा घेत तांदूळ वितरणाचा निर्णय जिल्हाधिकाºयांवर सोपविला आहे.

- ब्रम्हानंद जाधव लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: ग्रामीण भागापाठोपाठ आता शहरी भागातील शाळांमधील शिल्लक असलेला तांदूळ विद्यार्थ्यांमध्ये वितरीत करण्याचे निर्देश शिक्षण विभागाने दिले आहेत. बुलडाणा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने मात्र लॉकडाउनच्या कडक नियमांमुळे सावध पवित्रा घेत तांदूळ वितरणाचा निर्णय जिल्हाधिकाºयांवर सोपविला आहे. त्यामुळे जिल्हाधिकाºयांच्या निर्णयानंतर शहरी भागातील शाळेतील तांदूळ वितरणाचा तीढा सुटेल. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व शाळा बंद आहेत. विद्यार्थी पोषण आहारापासून वंचीत राहू नये, यासाठी ग्रामीण भागातील शाळास्तरावर शिल्लक असलेला तांदूळ व डाळी, कडधान्याचे विद्यार्थ्याना वितरण करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले होते. त्यानुसार जिल्ह्यात अंमलबाजवणी करण्यात आली. ग्रामीण भागातील जवळपास सर्वच शाळांमधील शिल्लक असलेला तांदूळ, डाळी विद्यार्थ्यांना वितरीत करण्यात आला आहे. आता ग्रामीण भागाप्रमाणेच राज्यातील सर्व शहरी भागातील शाळांमध्ये शिल्लक असलेला तांदूळ विद्यार्थी किंवा पालकांना वितरित करण्याचे निर्देश १५ एप्रिल रोजी शिक्षण विभागाने दिले आहेत. यासंदर्भात सर्व शिक्षणाधिकाºयांना शिक्षण विभागाकडून पत्र पाठविण्यात आले आहे. शाळेचे मुख्याध्यापक व योजनेचे काम पाहणारे शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी शिल्लक तांदळाचे विद्यार्थ्यांना समप्रमाणात वितरण करावयाचे आहे. परंतू जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढच आहे. या संसर्गाचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हाधिकाºयांनी जिल्ह्यात लॉकडाउनचे नियम कडक केले आहेत. त्यामुळे बुलडाणा जिल्हा परिषद शिक्षणाधिकाºयांनी विद्यार्थ्यांना तांदूळ वाटपाबाबतचा निर्णय जिल्हाधिकाºयांवर सोपविली आहे. यासंदर्भातील पत्र जिल्हाधिकाºयांना पाठविण्यात येणार असून त्यांनी दिलेल्या निर्णयानुसार तांदूळ वितरणाचा प्रश्न सुटणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

ग्रामीण भागाप्रमाणेच शहरी भागातील शाळांमध्ये शिल्लक असलेला तांदूळ विद्यार्थ्यांमध्ये वितरण करण्याच्या सुचना शिक्षण विभागाकडून आलेल्या आहेत. परंतू कोरोनाच्या पृष्टभूमीवर जिल्ह्याची परिस्थिती पाहता, तांदूळ वितरणाबाबत जिल्हाधिकारी जो निर्णय घेतील त्यानुसार अंमलबजावणी होईल. - एजाज खान, शिक्षणाधिकारी, प्राथमिक, बुलडाणा.

टॅग्स :buldhanaबुलडाणाSchoolशाळा