मेहकर : जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत शाळांना पुरविण्यात आलेल्या संगणक टेबलचा दर्जा तकलादू असून, या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी पंचायत समिती सभापती नीता दिलीपराव देशमुख यांनी केली आहे. सोमवारी पंचायत समिती कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत सभापती नीता देशमुख यांनी या टेबलचा दर्जा पत्रकारांना दाखविला. जिल्ह्यातील ५८२ व मेहकर तालुक्यातील १२ शाळांना ७९ संगणक संच व सोबत टेबल पुरविण्यात आले आहेत. या टेबलचा दर्जा निकृष्ट असून, पहिल्याच दिवशी काही टेबल मोडले. पुरवठादाराने जे सॅम्पल दाखवले होते. त्याप्रमाणे ते नसावे म्हणून या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी व तोपर्यंत पुरवठादारास पेमेंट देण्यात येऊ नये, अशी मागणी सभापती नीता दिलीपराव देशमुख यांनी केली आहे. यावेळी सभापती पती तथा माजी उपजिल्हाप्रमुख दिलीपबापू देशमुख उपस्थित होते.
शाळांना निकृष्ट संगणक टेबलचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 4:39 AM