यासोबतच शाळेचे मुख्याध्यापक म्हस्के यांच्या हस्ते सरपंच, उपसरपंच ,सदस्य व इतर पदाधिकारी व गावातील पत्रकारांचा सत्कार करण्यात आला.
शाळेचा विकास करण्यासाठी मदत करावी, असे आवाहन मुख्याध्यापक म्हस्के यांनी यावेळी केले. डॉ. प्रवीण नरवाडे यांनी शाळेसाठी एक लाख रुपये मदत दिली. त्याचे मुख्याध्यापकांनी यावेळी आभार मानले. यावेळी पंचायत समिती सदस्य दिलीप सिनकर, सरपंच शकुंतलाबाई महाले, उपसरपंच रुक्मिणीबाई काटोले, ग्रामपंचायत सदस्य शेषराव सावळे, नंदकिशोर देशमुख, गजानन लांडे, गणेश नरवाडे, किरण उगले, कृष्णा सिनकर, ताराबाई फुसे, मथुराबाई भुते, शिवगंगा पवार, शाळा समिती अध्यक्ष लताबाई आल्हाट व इतर शाळा समिती सदस्य, मधुकर महाले, किरण देशमुख, डॉ. प्रवीण नरवाडे, संभाजी देशमुख, मधुकर सिनकर, दादाराव महाले, सुभाष पवार व इतर पालक, गावकरी उपस्थित होते़ कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद मराठी शाळेतील मुख्याध्यापक म्हस्के व शिक्षक जोमाळकर, जाधव, रंगदळे, सोनटक्के, सावंत, धांडे आदींनी परिश्रम घेतले़