नाना हिवराळे खामगाव, दि. २२- स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) या राष्ट्रीय कार्यक़्रमाची राज्यात अंमलबजावणी सुरु असून, ऑ क्टोबर २0१६ पर्यंंत बुलडाणा जिल्हा ५0 टक्के हगणदरीमुक्त झाला आहे. जिल्ह्यातील ३ लाख ८२ हजार १९५ कुटुंबांपैकी १ लाख ९0 हजार ८८६ कुटुंबांकडे सद्यस्थितीत शौचालय आहेत. उघड्यावरील शौचविधीची प्रथा हद्दपार करण्यासाठी शासन स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अभियानाची अंमलबजावणी करीत आहेत. जिल्ह्यात सन २0१२ पासून हगणदरीमुक्त अभियानाने वेग घेतला. जिल्ह्यात ३ लाख ८२ हजार १९५ कुटुंबसंख्या असून, सन २0१२ मध्ये १ लाख ३१ हजार २३७ शौचालय संख्या होती. २0१३-१४ या वर्षात हगणदरीमुक्त लोकचळवळ उभी राहिली. या वर्षात जिल्ह्यात ७ हजार ८६४ शौचालये बांधकाम झाले, तर २0१४-१५ या वर्षात १0 हजार ५११ शौचालये, २0१५-१६ या वर्षात २६ हजार ३३६ कुटुंबानी शौचालये बांधली आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात १ लाख ९0 हजार ८८६ कुटुंबाकडे शौचालय असून, जिल्हा सद्यस्थितीत ५0 टक्के हगणदरीमुक्त झाला आहे. शासनाच्यावतीने गेल्या २२ ऑगस्ट ते २ ऑक्टोबर दरम्यान स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) राज्यव्यापी गृहभेट अभियान राबविण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी ५0 टक्के ग्रामपंचायती हगणदरीमुक्तीचे आवाहन केले. त्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यात गृहभेटी अभियान १00 टक्के यशस्वीपणे राबविण्यात आले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दीपा मुधोळ यांच्या मार्गदर्शनाखाली अभियानात जिल्ह्यातील ४८३ ग्रामपंचायतमध्ये ७९ हजार ९३२ कुटुंबांना संबंधित पंचायत समितीकडून गृहभेटी देण्यात आल्या. या गृहभेटीची फलश्रुती म्हणून जिल्ह्यात शौचालयाची कामे प्रगती पथावर आहेत. आतापर्यंंत शौचालय बांधकामामध्ये जिल्ह्यातून मलकापूर तालुका अव्वल राहिला आहे.
जिल्हा ५0 टक्के हगणदरीमुक्त!
By admin | Published: October 23, 2016 1:55 AM