प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी एकूण २ हजार ६३९ संदिग्धांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी २ हजार ५७७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा तालुक्यातील तीन, खामगाव एक, शेगाव एक, देऊळगावराजा ३२, चिखली १२, मलकापूर चार, मोताळा तीन आणि जळगाव जामोद तालुक्यातील सहा जणांचा समावेश आहे. दरम्यान, मेहकर, नांदुरा, लोणार, सिंदखेड राजा आणि संग्रामपूर तालुक्यांत तपासणी करण्यात आलेल्या संदिग्धांपैकी एकही जण कोरोनाबाधित आढळून आला नाही. दुसरीकडे ४४ जणांनी गुरुवारी कोरोनावर मात केली. आजपर्यंत तपासणी करण्यात आलेल्यांपैकी ५ लाख ७६ हजार ३५७ संदिग्धांचे अहवाल निगेटिव्ह आले असून, ८५ हजार ९७८ जणांनी कोरोनावर मात केली आहे.
९६ सक्रिय रुग्ण
जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या आता ८६ हजार ७३७ झाली असून, त्यापैकी ९६ सक्रिय बाधितांवर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. अद्यापही १ हजार ५७६ संदिग्धांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ६६३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.