लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: युवा वर्गाच्या कला व क्रीडा गुणांना वाव मिळावा या दृष्टीकोणातून गेल्या २५ वर्षापासून आयोजित करण्यात येत असलेल्या जिल्हास्तरयी युवा महोत्सवाचे २० डिसेंबर रोजी जिल्हा क्रीडा संकुलावर आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान २०१२ च्या राज्याच्या युवा धोरणातंर्गत या महोत्सवाला आता महत्त्व प्राप्त झाल्याने त्याची क्रेझही आता वाढली आहे.नाही म्हणायला केंद्र शासनामार्फत १९९४ पासून अशा पद्धतीने युवा महोत्सवाचे आयोजन केले जात आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या सहकार्यातून हा महोत्सव होत आहे. या महोत्सवामध्ये १५ ते २९ वर्षे वयोगटातील युवक युवती सहभागी होऊ शकतात. १८ डिसेंबर पर्यंत त्यासाठी नोंदणी करणे अनिवार्य आहे. युवा महोत्सवामध्ये लोकनृत्य, लोकगित, एकांकीका (हिंदी, इंग्रजी), शास्त्रीय गायन (हिंदुस्थानी), शास्त्रीय नृत्य, मणिपुरी नृत्य, ओडीसी नृत्य, भरतनाट्यम, कुचीपुडी नृत्य, कथ्थक, सितार, बासरी, तबला, विणा, मृदुंग, हार्मोनियम (लाईट), गिटार, वक्तृत्व (हिंदी, इंग्रजी) इत्यादी कलाप्रकारांचा समावेश आहे. लोकनृत्य कलाप्रकारात एका वेळी २० कलाकारांचा सहभाग राहू शकतो. लोकगितामध्ये सहा कलाकार एकाच वेळी सादरीकरण करू शकतात. यासोबतच एकांकीका लेखक, निर्माता, दिग्दर्शक सुद्धा यात युवा असावे. वर्क्तुत्व स्पर्धेसाठी वेळेवर विषय दिला जाईल. या महोत्सवात उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्यांची निवड ही विभागीय युवा महोत्सवासाठी होईल.(प्रतिनिधी)
बुलडाण्यात २० डिसेंबरला जिल्हास्तरीय युवा महोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 2:00 PM