प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या संदिग्धांच्या अहवालांपैकी एकूण २ हजार ६५७ जणांचे अहवाल प्राप्त झाले. यापैकी २ हजार ६५० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. दरम्यान, प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांपैकी दोन अहवाल हे प्रयोगशाळेत करण्यात आलेल्या तपासणीत पॉझिटिव्ह आले तर, ५ जण रॅपिड टेस्टमध्ये बाधित आढळून आले. पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये शेगाव शहरातील एक, लोणार तालुक्यातील भूमराळा येथील एक, सिंदखेड राजामधील आंचली येथील एक, खामगाव शहरातील एक, चिखली दोन आणि अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात येत असलेल्या सगड येथील एकाचा यामध्ये समावेश आहे. दुसरीकडे बुलडाणा, देऊळगाव राजा, मेहकर, मलकापूर, नांदुरा, जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यातील तपासणी करण्यात आलेल्या संदिग्धांपैकी एकही जण कोरोना बाधित आढळून आला नाही. दरम्यान, सहा जणांनी बुधवारी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. आजपर्यंत तपासणी करण्यात आलेल्या ६ लाख २३ हजार ३०१ संदिग्धांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सोबतच आजपर्यंत ८६ हजार ५३४ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे.
--जिल्ह्यात २० सक्रिय रुग्ण--
जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्याही कमी झाली असून, सध्या २० सक्रिय रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या ८७ हजार २२३ झाली आहे. दरम्यान, आजपर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे ६६९ जणांचा मृत्यू झाला आहे. अद्यापही १ हजार २६१ संदिग्धांच्या अहवालांची प्रतीक्षा असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते यांनी दिली.