शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
3
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
4
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
5
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
6
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
7
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
8
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
9
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
10
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
11
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
13
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
14
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
15
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
17
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
18
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
19
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांकडून वरिष्ठांची दिशाभूल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2017 12:43 AM

जिल्हा पुरवठा विभागातील अनागोंदी कारभारामुळे  जिल्ह्यातील सार्वजनिक वितरण  व्यवस्था धोक्यात आल्याची  धक्कादायक वस्तुस्थिती समोर आली आहे. धान्य वाहतुकीच्या  करारनाम्याची  पुरवठा अधिकार्‍यांकडून ऐशीतैशी करण्यात  आल्याने, मोठय़ा प्रमाणात रेशनचा तांदूळ काळ्या बाजारात  गेल्याची शक्यता वर्तविली जात असून, संशयाची सुई जिल्हा  पुरवठाअधिकार्‍यांभोवती फिरत असल्याची चर्चा आहे.

ठळक मुद्देस्वत:च्या स्वाक्षरीने मंजूर केली वाहतूक करणार्‍या वाहनांची यादीश्रीनाथ ट्रान्सपोर्ट कंपनी काळ्या यादीत!रेशन माल वाहतूक घोटाळा

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा:  जिल्हा पुरवठा विभागातील अनागोंदी कारभारामुळे  जिल्ह्यातील सार्वजनिक वितरण  व्यवस्था धोक्यात आल्याची  धक्कादायक वस्तुस्थिती समोर आली आहे. धान्य वाहतुकीच्या  करारनाम्याची  पुरवठा अधिकार्‍यांकडून ऐशीतैशी करण्यात  आल्याने, मोठय़ा प्रमाणात रेशनचा तांदूळ काळ्या बाजारात  गेल्याची शक्यता वर्तविली जात असून, संशयाची सुई जिल्हा  पुरवठाअधिकार्‍यांभोवती फिरत असल्याची चर्चा आहे. दरम्यान,  रेशनच्या धान्याच्या मालाची वाहतूक करण्यात आल्याचे  उघडकीस आल्याने, अमरावती येथील वाहतूक कंपनीला काळ्या  यादीत टाकण्याच्या हालचाली सुरू असल्याची खात्रीलायक  माहिती समोर आली आहे. रेशनच्या मालाची वाहतूक करण्यासाठी कंत्राटदाराशी करण्यात  आलेल्या करारनाम्यातील तिसर्‍या क्रमांकाच्या अटी व शर्तीनुसार,   धान्य वाहतूक करणार्‍या वाहनांना स्वखर्चाने हिरवा रंग देणे,  तसेच या वाहनांवर  ‘सार्वजनिक वितरण व्यवस्था सुधारित धान्य  वितरण पद्धत महाराष्ट्र शासन’ असे स्पष्ट लिहून सदर वाहनांना  जिल्हाधिकारी बुलडाणा यांच्याकडून लेखी मान्यता घेऊनच सदर  वाहनाचा वाहतुकीसाठी उपयोग करणे बंधनकारक आहे. त्याच प्रमाणे १४ व्या क्रमाकांच्या अटी व शर्तीनुसार,  धान्याची अफरा तफर आणि काळाबाजार करण्यास प्रतिबंध घालण्यात आला  आहे. यामध्ये  कंत्राटदाराने सादर केलेली मालकीच्या व  नियंत्रणाखालील वाहनांच्या यादी व्यतिरिक्त वाहतूकदाराने वाह तुकीकरिता अतिरिक्त वाहने उपलब्ध करून दिल्यास अशा  वाहनांच्या नोंदणी क्रमांकासह यादीस जिल्हाधिकारी लेखी मान्यता  देतील, अशा वाहनाव्यतिरिक्त अन्य वाहनांमध्ये धान्य भरून  देण्यात येणार नाही, मान्यताप्राप्त वाहनाव्यतिरिक्त इतर वाहनातून  वाहतूक केल्यास सदरची धान्य वाहतूक काळ्याबाजारात  नेण्यासाठी करण्यात येत असल्याचे मानून वाहतूक कंत्राटदारावर  कारवाई करण्यात येईल, असा करार आहे; मात्र चिखली, धाड  आणि खामगाव या तीनही घटनांमध्ये गाडीला हिरवा रंग आणि  लिहिलेले आढळून आले नाही. त्यामुळे जिल्हा पुरवठा  अधिकार्‍यांनी आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करीत, श्रीनाथ  ट्रान्सपोर्ट कंपनीला रेशनच्या मालाची वाहतूक करण्यासाठी स्वत:  मान्यता दिल्याची धक्कादायक वस्तुस्थिती समोर आली आहे. मालाच्या वाहतुकीचे आदेश देण्याचे अधिकार जिल्हाधिकार्‍यांना  असताना, जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग  करून कंत्राटदाराशी संगनमत करीत असल्याची चर्चा असून, या  माध्यमातून दिशाभूल करीत, जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांनी  कोट्यवधी रुपयांच्या धान्यांच्या अफरातफरीस प्रोत्साहन दिल्याचे  दिसून येते. 

या वाहनांतून नियमबाह्य वाहतूक!२२ जून २0१७ रोजी चिखली येथे एम एच १९-२0९७ या  ट्रकमधून ३५0 कट्टे, २0 जुलै २0१७  रोजी धाड येथे  एम एच  0२- एक्सए - ६५४१ या वाहनातून १0२ कट्टे त्याचप्रमाणे २0  ऑगस्ट २0१७ रोजी खामगाव येथे एम.एच. २८ एबी ७९६९ या  वाहनातून सुमारे ४00 कट्टे तांदूळ जप्त करण्यात आला.  उपरोक्त  तीनही वाहनांतून नियमबाह्य वाहतूक झाल्याचे समोर आले आहे.

श्रीनाथ ट्रान्सपोर्ट कंपनी काळ्या यादीत!जिल्ह्यात दोन महिन्यांच्या कालावधीत तब्बल सात घटना  उघडकीस आल्या. दरम्यान, खामगाव येथे ट्रक पकडण्यात  आल्यानंतर ट्रकमधील माल शासनजमा करण्यात आला. या  ट्रकमध्ये शासकीय बारदाना निघाल्याने, या प्रकरणाचे बिंग  फुटल्यानंतर अमरावती येथील श्रीनाथ ट्रान्सपोर्ट कंपनीला काळ्या  यादीत टाकण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे समजते. यासंदर्भात  जिल्हाधिकारी आणि जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांनी संबंधित कं पनीला कारणे दाखवा नोटिस बजावली आहे. त्यामुळे या कंपनीला  काळ्या यादीत टाकण्याचे संकेत मिळत आहेत.