प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या संदिग्धांच्या अहवालांपैकी १ हजार ९६ जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी १ हजार ९४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. दरम्यान, पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये जळगाव जामोद तालुक्यातील सताळी येथील एक व चिखली शहरातील राजा टॉवर परिसरातील एकाचा समावेश आहे. कोरोनावर मात केल्यामुळे चार जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. आजपर्यंत तपासणी करण्यात आलेल्या संदिग्धांपैकी ६ लाख २५ हजार २३३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सोबतच ८६ हजार ५४३ कोरोना बाधितांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली.
--१४२९ अहवालांची प्रतीक्षा--
कोरोना संदिग्धांच्या घेण्यात आलेल्या अहवालांपैकी १ हजार ४२९ जणांच्या अहवालांची अद्याप प्रतीक्षा आहे. जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ८७ हजार २२९ झाली असून, त्यापैकी १७ सक्रिय रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. जिल्ह्यात आजपर्यंत ६६९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.