शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित ठाकरेंनी लढण्याचा निर्णय दिल्लीतून झाला; संजय राऊतांचा दावा
2
माघारीसाठी दबाव, पण सदा सरवणकरांचं अखेर ठरलं; मुलाच्या व्हॉट्सॲप स्टेटसची चर्चा
3
Arvind Kejriwal : "भाजपाला मत दिलं तर..."; अरविंद केजरीवाल यांचा दिल्ली निवडणुकीबाबत मोठा दावा
4
“उद्धव अन् राज यांनी अजिबात एकत्र येऊ नये”; अमित ठाकरे स्पष्टच बोलले, कारणही सांगितले
5
एका शेअरवर ९ शेअर्स फ्री देणार 'ही' कंपनी; वर्षभरात दिलाय ४००% चा रिटर्न, शेअर सुस्साट...
6
मविआमधील तिढा सुटेना, शरद पवार यांनी जागावाटपाबाबत दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाले...  
7
Waaree Energies Share Price : वारी एनर्जीच्या आयपीओनं केलं मालामाल, ७०% प्रीमिअमवर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी मोठा फायदा
8
मोठी बातमी! जनगणना पुढील वर्षीपासून होण्याची शक्यता; लोकसभा मतदारसंघांवर मोठा परिणाम होणार
9
उमेदवारी अर्ज भरायची मुदत संपायला आली, पण मविआ, महायुतीमधील जागावाटपाचा तिढा सुटेना, अजून एवढ्या जागांवर वाद कायम
10
भारताच्या अरमान भाटीयाने जिंकली इंडिया मास्टर्स पिकलबॉल स्पर्धा; अमेरिकन खेळाडूला हरवलं!
11
माहिममध्ये शिंदे गट अमित ठाकरेंना पाठिंबा देणार? मुख्यमंत्री शिंदे-सरवणकरांमध्ये चर्चा, केसरकर म्हणाले....
12
Swiggy चा IPO 'या' तारखेपासून गुंतवणूकीसाठी खुला होण्याची शक्यता, पटापट चेक करा डिटेल्स
13
"रशिया-युक्रेन युद्ध मोदी थांबवू शकतात"; युक्रेनियन राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी व्यक्त केला विश्वास
14
मविआत अजून गोंधळात गोंधळ, २३ मतदारसंघांत उमेदवारच नाही; अर्ज भरायला दोनच दिवस शिल्लक
15
"मी जिवंत आहे आणि...", निधनाची अफवा पसरल्यानंतर नीना कुळकर्णींनी शेअर केली पोस्ट
16
Rule Change: एलपीजी ते क्रेडिट कार्डापर्यंत; १ नोव्हेंबरपासून होणार 'हे' ६ बदल, खिशावर होणार परिणाम
17
सोफिया सीव्हिंगने 'इंडिया मास्टर्स पिकलबॉल' स्पर्धेत मारली बाजी! मिळवलं पहिल्या हंगामाचं जेतेपद
18
आजचे राशीभविष्य, २८ ऑक्टोबर २०२४: नशीबाची साथ मिळेल, मित्रांशी भेटी होतील, प्रवास घडेल.
19
नागा चैतन्यने पुसून टाकली समांथाची शेवटची आठवण! शोभिताशी लग्न करण्यापूर्वी Ex पत्नीसोबतचा फोटो केला डिलीट
20
"तो माझ्या जवळ येऊन...", भाग्यश्रीने 'मैंने प्यार किया'दरम्यानचा सलमान खानचा सांगितला 'तो' किस्सा

दिवाळी तोंडावर आली तरी चार शिधा जिन्नसांचा साठा पोहोचलाच नाही!

By अनिल गवई | Published: October 20, 2022 2:28 PM

लाभार्थी संतप्त: स्वस्त धान्य दुकानदार आणि लाभार्थ्यांमधील वाद विकोपाला

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: सार्वजनिक वितरण व्यवस्थेतंर्गत पात्र शिधापत्रिकाधारकांना दिवाळीनिमित्त ४ शिधाजिन्नसांचा समावेश असलेल्या अन्न संचाच्या वितरणाची घोषणा राज्य शासनाने केली आहे. मात्र, दिवाळीपूर्वी या शिधाजिन्नसांचा पुरवठाच झाला नाही, परिणामी जिल्ह्यातील चार लक्ष ८८ हजार लाभार्थ्यांना दिवाळीच्या तोंडावरच संचाचे वितरण रखडल्याची वस्तुस्थिती समोर येत आहे.

‘राज्य सरकारनं  दिवाळीनिमित्त गोरगरीबांना शिधा देण्याचा निर्णय घेतला. चार शिधा जिन्नस वितरीत करण्यासाठी साधारणपणे ५१३ कोटी रुपयांचा कंत्राट देण्यात आला. ठरावित कालावधीत टप्पे निहाय संबंधित वस्तू दिवाळी पूर्वी राज्यातील सर्वच गोदामात संच पोहोचणे आवश्यक होते. मात्र, विदर्भातील अनेक गोदामात अद्यापपर्यंत किट पोहोचलेच नाही. अर्धवट आणि अपुºया मालामुळे पश्चिम विदर्भातील बुलडाणा जिल्ह्यासह अनेक ठिकाणी संचाचे वितरण रखडले आहे. त्यामुळे लाभार्थी आणि स्वस्त धान्य दुकानदारामध्ये खटके उडत आहेत. त्याचवेळी संच वितरणाला वेळेचे बंधन आल्याने स्वस्त धान्य दुकानदारांना स्वत:च संच तयार करावा लागणार असल्याची आपातकालीन परिस्थिती बुलडाणा जिल्ह्यात निर्माण झाली आहे.  राज्य शासनाने जे  पुरवठादार ठरवले आहेत, त्यांच्यावर आधीच आधीच गुन्हे दाखल आहेत, ते पूर्वी ब्लॅकलिस्टेड होते. तीन-चार दिवसांत हे पुरवठादार ठरवल्यानं इतर पुरवठादार येऊ शकले नाहीत. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलनही पुकारले होते. तथापि,  गरीबांची दिवाळी ‘गोड’ करण्या ऐवजी पुरवठादाराचीच दिवाळी ‘गोड’ केली जाणार असल्याची जाणीवपूर्वक वेळ सरकारने आणली तर नाही ना? असा प्रश्न सामान्यांमध्ये उपस्थित होत आहे.  शंभर क्विंटलची मागणी असताना ८० क्विंटल तोही अपुराचा साठा गोदाम पालांना प्राप्त झाला आहे.

काही ठिकाणी डाळ तर काही ठिकाणी मैदा नाही!- जिल्ह्यातील १६ गोदामांवर कुठे चणा डाळ पोहोचली आहे. तर कुठे मैदाचा साठा उपलब्ध आहे. मात्र, त्याचवेळी कुठे तेल तर कुठे साखरेचा तुटवडा आहे. चारही शिधा जिन्नस आणि त्यांचा संच कुठेही उपलब्ध नसल्यामुळे दिवाळीपूर्वी संच वितरीत करायचे तरी कसे? असा पेच पुरवठा विभागाच्या समोर उभा राहीला आहे.

गोदाम निहाय आवश्यक संचाची मागणीबुलडाणा ५०२४२चिखली ४०१०९अमडापूर १२९०५देऊळगाव राजा २३९९७सिंदखेड राजा २०५५३साखरखेर्डा १४०७६मेहकर ३४५४२डोणगाव ११६९२लोणार ३१९१८खामगाव ४६६९१शेगाव २८२१२मलकापूर ३४२३२मोताळा ३३५१२नांदुरा ३९१५५जळगाव जामोद ३२७२७संग्रामपूर ३३४४५एकुण ४८८००८

योजनानिहाय लाभार्थीअंत्योदय अन्न योजना ६२५६७प्राधान्य गट लाभार्थी ३४०८२३शेतकरी लाभार्थी ८४६१८

टॅग्स :Diwaliदिवाळी 2022