बुलडाणा: विदर्भातील शेतकर्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात असल्या तरी आत्महत्यांचे सत्र थांबत नाही. शेतकर्यांची विपन्नावस्था दूर करण्यासाठी अल्पकालीन उपाययोजनांसह दीर्घकालीन उपाययोजनांची अंमलबजावणी केली पाहिजे, असे मत व्यक्त करून शेतकर्यांना द्याव्या लागणार्या मदतीसाठी सरकारने निश्चित असा आकस्मिक निधी उभारावा तसेच रोजगार हमी योजनेचा विस्तार करून शेतीमधील कामांचाही समावेश करावा, अशी शिफारस काँग्रेस पक्षाच्या दुष्काळ निवारण उपाययोजना समितीची राहील, असे माजी मंत्री प्रा. वसंत पुरके यांनी सांगितले.जिल्हा परिषद अध्यक्ष अलका खंडारे यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत प्रा. पुरके बोलत होते. काँग्रेसच्यावतीने दुष्काळ निवारणासाठी उपाययोजना सुचविण्यासाठी विभागवार समिती गठित करण्यात आली असून, ही समिती १ जानेवारी रोजी बुलडाणा जिल्हा दौर्यावर होती. या संदर्भात समिती सदस्य प्रा. वसंत पुरके यांनी माहिती दिली. यावेळी समितीचे सदस्य बंडू सावरबांधे, हिदायत पटेल, संजय खोडके, श्याम उमाळकर यांच्यासह जिल्हा परिषद अध्यक्ष अलका खंडारे, आमदार हर्षवर्धन सपकाळ आदी उपस्थित होते. जिल्हानिहाय वेगवेगळे धोरण आखण्यापासून तर शेतकर्यांचे मनोबल उंचावण्यासाठी विशेष उपक्रमांचे आयोजन करणे गरजेचे आहे. आजच्या दौर्यामध्ये समितीने संग्रामपूर, शेगाव, खामगाव, बुलडाणा, चिखली या भागातील शेतकर्यांसोबत संवाद साधला तसेच ङ्म्री संत गजानन महाराज संस्थानचे विश्वस्त शिवशंकरभाऊ पाटील, अकोला जिल्हाधिकारी शिंदे यांच्याशीही चर्चा केली. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय अंभोरे, आमदार सपकाळ यांच्यासोबत चर्चा करून त्यांच्या सुचनांचा अंतर्भाव समितीच्या शिफारशीमध्ये असेल, असे ते म्हणाले.
आकस्मिक निधी अन् शेतीची कामे रोहयोमध्ये करा
By admin | Published: January 02, 2015 12:53 AM