शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
6
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
9
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
10
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
11
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
12
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
13
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
14
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
15
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
16
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
17
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
18
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
19
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
20
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर

‘त्या’ दारूच्या दुकानाला  परवानगी देऊ नये!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2017 12:28 AM

बसस्थानक परिसरात असलेल्या चनखोरे कॉलनी, वडारपुरा, शर्मा ले-आऊट या भरवस्तीत देशी दारूचे दुकान होते. न्यायालयाच्या आदेशानुसार सदर दुकान बंद झाले होते; मात्र हे दुकान पुन्हा सुरू होण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून, या दारूच्या दुकानाला परवाना देऊ नये, यासाठी येथील चनखोरे कॉलनी, वडारपुरा व शर्मा ले-आऊटमधील रहिवाशांनी सामूहिकपणे ९ सप्टेंबर रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक दिली. 

ठळक मुद्देनागरिकांचे उपविभागीय अधिकार्‍यांना निवेदनबसस्थानक परिसरातील दुकाने

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर : बसस्थानक परिसरात असलेल्या चनखोरे कॉलनी, वडारपुरा, शर्मा ले-आऊट या भरवस्तीत देशी दारूचे दुकान होते. न्यायालयाच्या आदेशानुसार सदर दुकान बंद झाले होते; मात्र हे दुकान पुन्हा सुरू होण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून, या दारूच्या दुकानाला परवाना देऊ नये, यासाठी येथील चनखोरे कॉलनी, वडारपुरा व शर्मा ले-आऊटमधील रहिवाशांनी सामूहिकपणे ९ सप्टेंबर रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक दिली. बसस्थानकासमोर सोनाटी रोडवर चनखोरे कॉलनी, वडारपुरा व शर्मा ले- आऊट या भरवस्तीला लागून जयस्वाल यांचे देशी दारूचे दुकान आहे. सदर दुकानाच्या जवळच मल्टी हॉस्पिटल आहे. त्यामुळे येथे रुग्णांची नेहमी ये-जा असते. या दारूच्या दुकानावर लोक दारू पिऊन धिंगाणा घालतात. सदर दुकान रहदारीच्या रस्त्याला लागून आहे. बसस्थानक जवळच असल्याने दारुडे दारू पिऊन बसस्थानकावर असलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना त्रास देत असतात.  दुकानापासून ३0 फूट अंतरावर मारोती मंदिर आहे. भाविकांना या दारू दुकानामुळे त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे सदर दारू दुकानाचा परवाना रद्द करून येथून सदर दुकान हटवावे, अशी मागणी चनखोरे कॉलनी, शर्मा ले-आऊट, वडारपुरामधील रहिवासी गणेश लष्कर, कैलास चनखोरे, ज्ञानेश्‍वर आव्हाळे, शिवाजी तुपकर, रामेश्‍वर पिटकर, शंकर लष्कर, अर्जुन मंजुळकर, रमेश अण्णा गायकवाड, कैलास भांडेकर, सुनील जाधव, शंकर म्हस्के, अशोक मंजुळकर, विजय गायकवाड, कैलास मोरे यांच्यासह ३00 नागरिकांनी सह्यानिशी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले आहे.