शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
3
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
4
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
5
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
6
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
8
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
9
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
10
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
11
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
12
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
13
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
14
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
15
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
16
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
17
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
18
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
19
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
20
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार

नववर्षाच्या स्वागताला दारू नको, दूध प्या -  हिरकणी महिला उत्कर्ष प्रतिष्ठानचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 12:57 AM

चिखली : ‘थर्टी फस्र्ट’ म्हटलं की दारूची पार्टी, हे जणू समीकरणच झालं आहे; मात्न दारु पिऊन झिंगलेल्या बेधुंद अवस्थेत नववर्षाचे स्वागत करण्याच्या कुप्रथेला फाटा देत स्वागत उत्साह आणि मंगलमय वातावरणात नववर्षाचं स्वागत करण्यासाठी दारू ऐवजी दूध पिऊन नववर्षाचं स्वागत करण्याचे आवाहन दारुमुक्ती निर्धार परिषद व हिरकणी महिला उत्कर्ष प्रतिष्ठानने केले आहे.

ठळक मुद्देदारूमुक्ती निर्धार परिषद

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : ‘थर्टी फस्र्ट’ म्हटलं की दारूची पार्टी, हे जणू समीकरणच झालं आहे; मात्न दारु पिऊन झिंगलेल्या बेधुंद अवस्थेत नववर्षाचे स्वागत करण्याच्या कुप्रथेला फाटा देत स्वागत उत्साह आणि मंगलमय वातावरणात नववर्षाचं स्वागत करण्यासाठी दारू ऐवजी दूध पिऊन नववर्षाचं स्वागत करण्याचे आवाहन दारुमुक्ती निर्धार परिषद व हिरकणी महिला उत्कर्ष प्रतिष्ठानने केले आहे.नवीन वर्षाचे स्वागत करायचे, म्हणून ३१ डिसेंबर रोजी मन मानेल तितकी दारू प्यायची आणि मद्याच्या बेधुंदीत नवीन वर्षाचा सूर्य उगवत असताना, कुठेतरी लोळत पडायचे, हा नवीन प्रकार आजकाल सर्वदूर तरुणाईकडून केला जातो. वास्तविकत: नवीन वर्षाचे स्वागत उत्साहात आणि मंगलमय वातावरणात होणे अपेक्षित असताना युवा पिढी दारूच्या धुंदीत पडलेली दिसून येते. कधी नव्हे तो दारूची चव घेणाराही यामुळे भविष्यात व्यसनाधिनतेकडे झुकू शकतो, ही बाब टाळली गेली पाहिजे. यासाठी दारूमुक्ती निर्धार परिषदेचे जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी सदस्य ठिकठिकाणी नववर्षाच्या स्वागतासाठी दूध वाटपाचा कार्यक्रम राबविणार आहेत., तर हिरकणी महिला उत्कर्ष प्रतिष्ठाणनद्वारे दारूपासून परावृत्त करण्यासाठी ३0 व ३१ डिसेंबर रोजी पथनाट्याद्वारे तरुणाईचे लक्ष वेधल्या जात आहे.  ३१ डिसेंबर, गटारी अमावास्या यांसारख्या दिवशी राज्यात होणार्‍या दारू विक्रीचा आकडा सर्वोच्च आहे. नववर्षाचे स्वागत व सरत्या वर्षाला निरोप या निमित्ताने सर्व बंधने झुगारून तरुणांसह अनेक जण मनमुराद दारू पितात. एवढी की यादिवशी रात्रीपर्यंत दारू पिलेले अनेक लोक पाहाटे रस्त्याच्या कडेला, इकडे तिकडे, झिंगलेल्या अवस्थेत पडलेले दिसतात, हा नववर्षाचे स्वागत करण्याचा अत्यंत किळसवाणा प्रकार आहे. तसेच ‘ट्रेंड’ म्हणूनही अनेक जण यानिमित्ताने दारूचा पहिला घोट घेतात आणि हळूहळू दारूच्या आहारी जावून आपले संपूर्ण आयुष्य बरबाद करून घेतात. हा प्रकार टाळावा, दारूच्या व्यसनामुळे उद्ध्वस्त झालेल्या कुटूंब आणि कुटुंबियांची स्थिती नवीन तरुणाईची होऊ नये, यासाठी त्यांना दारूपासून परावृत्त करण्यासाठी दारूमुक्ती निर्धार परिषदेच्यावतीने यावर्षी विशेष प्रयत्न केल्या जात आहेत.  यानुषंगाने समुपदेशन करण्याचे कार्यदेखील दारू मुक्ती निर्धार परिषदेच्यावतीने जिल्हा कार्यकारिणीसह सर्व सदस्य ३१ डिसेंबर रोजी करणार आहेत. 

पथनाट्याद्वारे जनजागृतीदारूमुक्तीसाठी आग्रही असलेल्या हिरकणी महिला उत्कर्ष प्रतिष्ठाणच्यावतीने तरूणांनी दारूच्या आहारी जाऊ नये, यासाठी विविध माध्यमातून आवाहन करण्यासोबतच पथनाट्याच्या माध्यमातूनही उद्बोधन केले जात आहे.  या प्रयत्नाला सुजान नागरिकांनीही पाठबळ देऊन वैयक्तिक स्तरावर तरुणाईला दारूपासून परावृत्त करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन हिरकणी प्रतिष्ठाणच्या वृषाली बोंद्रे व दारूमुक्ती निर्धार परिषदेचे नरेंद्र लांजेवार, रणजित राजपूत, गणेश वानखेडे, सुनीता भांड, राजेंद्र वानखेडे, ज्योती ढोकणे, पंजाबराव गायकवाड, मंजितसिंग शीख यांनी केले आहे.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाchikhali roadचिखली रोड