दूषित पाण्यामुळे होणारे आजार
उलटी, टायफाॅईड
कॉलरा, गॅस्ट्रोव्हायरल
इन्फेक्शन, कावीळ
ही आहेत आजाराची लक्षणे
१) उलट्या, ताप, लघवी पिवळी होणे, भूक न लागणे ही कावीळची लक्षणे आहेत. डोळे पिवळे दिसायला लागतात. महिना ते दीड महिना आजाराची लक्षणे कायम राहतात.
२) गॅस्ट्रो या आजारात रुग्णाला उलटी, जुलाब होतात. दूषित पाणी पिल्यानंतर चार ते पाच तासांत ही लक्षणे दिसू लागतात.
३) टायफाॅईड दूषित पाण्यामुळे होतो. रुग्णाला ताप येतो. पोटात दुखते, उपचार न घेतल्यास जंतू रक्तात मिसळतात.
...अशा प्रकारे घ्यावी काळजी
पाण्याची भांडी दररोज स्वच्छ धुऊन त्यात पाणी भरावे.
पिण्याचे पाणी हे नेहमी गाळून व उकळून प्यावे.
पाण्यामध्ये मेडिक्लोरचे काही थेंब टाकावेत.
बाहेरील पाणीपुरी, भेळ अथवा इतर पदार्थ खाणे टाळावे.
नागरिकांनी पावसाळ्यात एवढी खबरदारी घेतल्यास अनेक आजार दूर राहू शकतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
बुलडाणेकरांना प्रतिदिन ११ एमएलडी पाणी
बुलडाणा शहरात ८० हजारांच्या आसपास लोकसंख्या आहे. दररोज नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून शहराला ११ एमएलडी पाणी पुरविले जाते. सध्या शहरात पाच ते सहा दिवसांआड पाणीपुरवठा केल्या जात आाहे. शहराला येळगाव प्रकल्पातून पाणीपुरवठा होतो.