बुलडाणा, दि. १५- डॉक्टरांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी बुधवार, १६ नोव्हेंबर रोजी एकदिवसीय लाक्षणिक संपाचे आयोजन करण्यात आले आहे. या संपात अँलॉपॅथी डॉक्टरांचा समावेश असून, बुलडाणा शहरातील ६0 वैद्यकीय प्रतिष्ठाने यानिमित्त बंद राहणार असल्याची माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनच्यावतीने देण्यात आली.येथील पत्रकार भवनात आज इंडियन मेडिकल असोसिएशनच्यावतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी इंडियन मेडिकल असोसिएशनचे राज्य कार्यकारिणी सदस्य डॉ.जे.बी. राजपूत, जिल्हाध्यक्ष डॉ.जी.बी. राठोड, सचिव संदीप साबळे आदींनी माहिती दिली. कोषाध्यक्ष डॉ. सदीप वडते, केंद्रीय प्रतिनिधी डॉ.व्ही.एस. चिंचोले, स्टेट कौन्सिल डॉ.आर.सी. भागवत यांची यावेळी उपस्थिती होती. यावेळी डॉ. राजपूत म्हणाले, की इंडियन मेडिकल कौन्सिल ही वैद्यकीय व आरोग्यावर निर्णय घेणारी एकमेव संघटना होती; परंतु ती बंद करून सरकार डॉक्टरांचा समावेश नसणारी सेवानवृत्त आयएएस अधिकारी यांची नॅशनल मेडिकल कमीशनची स्थापना करत आहे. या कमिशनमुळे एम.बी.बी.एस व इतर चिकित्सा पद्धतीद्वारे प्रॅक्टिस करण्याची मान्यता रद्द करण्यात येणार आहे. खासगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या ६0 टक्के शुल्क आकारणीचे अधिकार या कमिशनला राहणार आहे. यासह चिकित्सक व व्यावसायिक कार्यस्थळावर सुरक्षा प्रदान करणे, पीसीपीएनडीटीच्या कायद्यात बदल करावा, डॉक्टरांच्या चुकीमुळे मृत्यू पावल्यास देय राशीची रकमेची र्मयादा ठरवावी, अशा जवळपास सात मागण्यांसाठी एकदिवसीय लाक्षणिक आंदोलन आयएमएच्यावतीने करण्यात येणार असल्याचे आयएमए पदाधिकार्यांनी सांगितले.
बुलडाणा जिल्हय़ातील डॉक्टर आज संपावर!
By admin | Published: November 16, 2016 2:55 AM