बुलडाणा : सार्वजनिक वितरण योजनेंतर्गत धान्य पुरवठा करण्यात तांत्रिक अडचणी आल्याने राज्य शासनाने पोर्टेबिलिटीचा पर्याय खुला करून दिला आहे. या पर्यायामुळे अनेकांना रेशन दुकानांचा पर्याय उपलब्ध झाला असल्याने एखादा रेशन दुकानदार रेशन देत नसल्यास किंवा त्याच्याशी पटत नसल्याने कार्डधारक दुकानदार बदलून इतर दुकानात धान्य घेत आहेत. जून महिन्यात जिल्ह्यातील १३ हजार ७१४ कार्डधारकांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे. सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत जिल्ह्यातील कार्डधारकांना अल्पदरामध्ये अन्नधान्याचा पुरवठा केला जातो. अन्न सुरक्षा योजना, दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी अशा गटात वर्गीकरण करून लाभार्थ्यांना धान्य वितरित केले जाते. या प्रक्रियेमध्ये अनेकवेळा रेशन दुकानदारांसंदर्भात तक्रारी होतात.
काही ठिकाणी लाभार्थ्यांच्या अडचणी असतात. अशावेळी या लाभार्थ्यांना रेशनचा पुरवठा व्हावा, या उद्देशाने पोर्टेबिलिटी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिल्ह्यातील १३ हजार ७१४ ग्राहकांनी दुकानदारच बदलला आहे.
शहरात जास्त बदल
ग्रामीण भागातून शहरी भागात माेठ्या प्रमाणात कामानिमित्त स्थलांतर होत असते. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक शहरातील दुकानात धान्य घेतात.
या गावातील नागरिकांना अन्य दुकानातून पोर्टेबिलिटीद्वारे धान्य देण्यात येते.
मजूर हे या पोर्टेबिलिटीच्या साहाय्याने घान्य घेत आहेत
नाेव्हेंबरपर्यंत मिळणार माेफत धान्य
प्रधानमंत्री गरीब कल्याण व राष्ट्रीय अन्न सुरक्षे अंतर्गतच्या लाभार्थ्यांना मे, जून महिन्यात मोफत धान्य वितरित करण्यात आले. यात प्राधान्य कुटुंब, अंत्योदय कार्डधारकांना लाभ मिळत आहे. येेत्या नोव्हेंबर महिन्यापर्यंत प्रतिव्यक्ती २ किलो तांदूळ व २ किलो गहू वितरित होत आहे.
चिखली १४०९
बुलडाणा २०८७
देऊळगावराजा ३२३
जळगाव जामाेद ८७४
खामगाव १७६०
लाेणार ६४२
मलकापूर २०६३
मेहकर १३७३
माेताळा ५५७
नांदुरा ५७५
संग्रामपूर ६८०
सिंदखेड राजा ३५६
शेगाव १०१५