प्रभू श्रीरामचंद्राचे भव्य दिव्य मंदिर निर्माण कार्यासाठी प्रत्येक रामभक्त आपापल्यापरीने समर्पण देत आहे. यामध्ये आपलाही खारीचा वाटा असावा, या उदात्त हेतूने नगराध्यक्षा प्रिया बोंद्रे यांच्या परिवाराच्यावतीने मंदिर निर्माण कार्यामध्ये १ लाख ५१ रुपयांचे दान देण्यात आले आहे. निधीचा धनादेश कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक काशिनाथआप्पा बांद्रे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. यावेळी सतीश गुप्ता, अॅड. विजय कोठारी, प्रेमराज भाला, नगर संघचालक शरद भाला, भगवानदास नागवाणी, शीतल गुरुदासानी, अच्युतराव पडघाण, सुरेंद्र पांडे, श्रीराम कुटे, हनुमंत भवर, विलास श्रीवास्तव, गोविंद कोठारी, प्रवीण वराडे, पंकज कोठारी, ओमप्रकाश गोंधणे, कमलाकर शेटे, महेश लुकड, पवन अग्रवाल, संजय सिसोदिया, अनिल व्यास, नारायण खरात, सुदर्शन खरात, पवन शिराळे आदींची उपस्थिती होती. दरम्यान, श्रीराम मंदिर ही सर्व भारतीयांची अस्मिता आहे. त्यामुळे प्रत्येक श्रीरामभक्ताने शक्य तितके आर्थिक योगदान देऊन या पवित्र कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन नगराध्यक्षा बोंद्रे यांनी केले आहे.
राम मंदिरासाठी १ लाख ५१ हजारांचे दान !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2021 4:29 AM