दोन महिन्यांपासून नगरपरिषद प्रशासनाकडून कुठल्याही कोरोना प्रतिबंधक उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. मात्र, कोविड-१९ संदर्भात असलेल्या नियमावलीचा फायदा घेऊन दररोज दुपारी ४ वाजल्यानंतर न. प. कर्मचारी शहरातील किरकोळ व्यावसायिक, भाजीपाला व फळविक्रेत्यांना नाहक त्रास देत आहेत. याचवेळी शहरातील मोठ्या व्यावसायिकांना मात्र, झुकते माप देऊन त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. फवारणी केली नसल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. शहरातील फळविक्रेते, भाजीपाला विक्रेते अशा किरकोळ व्यावसायिकांना त्रास देण्यात येऊ नये व साफसफाई करून फवारणी करण्यात यावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी शहरप्रमुख श्रीराम झोरे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख शिवाजी देशमुख, युवा सेना तालुकाप्रमुख नंदू कऱ्हाडे, युवा सेना शहरप्रमुख विलास घोलप, प्रीतम गैची, समाधान जाधव, मनोज वाघमारे, रवी पेटकर, दत्ता देशमुख, बंटी कपूर, सतनाम वधवा, पप्पू परिहार, दीपक शिंदे, आनंद गैची, शे. बबलू, विनायक गुळवे, शे. इरफान, प्रल्हाद वाघ, सचिन झगरे, शंभू गाडेकर, शे. सोहील शहा, समीर शेख, अनिल जावरे, समाधान वाघमारे, शे. नजिम, सचिन जोशी, उमेश झोरे आदी उपस्थित होते.
पावसाचे पाणी घरात शिरत असल्याने नुकसान
चिखली न. प. प्रशासनाकडून शहरात मान्सूनपूर्व साफसफाई केली नसल्याने गटारे, नाल्यांमध्ये कचरा साचला आहे. त्यामुळे पावसाचे पाणी वाल्मिकनगर, राममंदिर परिसरातील घरांमध्ये शिरून नागरिकांचे मोठे नुकसान होत आहे.