लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: संपुर्ण जिल्ह्यात गाजत असलेल्या ठिबक सिंचन घोटाळ्यात पाच दिवस उलटले तरी अद्याप कृषी विभागाकडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही होवू शकली नाही. दरम्यान जिल्हयातील घाटावरील भागात चिखली, मेहकर व बुलडाणा तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी सुद्धा ठिबक सिंचनचे बोगस अनुदान लाटल्याचे दिसून येते. जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी या सर्व प्रकाराची दखल घेण्याची गरज आहे.‘लोकमत’ने पंतप्रधान कृषी सिंचन योजनेतील घोटाळा उघड केल्यानंतर जिल्ह्यातील अनेक गावात झालेला गैरप्रकार समोर येत आहे. आधी घाटाखालील सहाही तालुक्यात ठिबक सिंचन घोटाळा उघड झाल्यानंतर एकेका गावातील गैरप्रकार समोर येत आहे. यामध्ये बुलडाणा, चिखली व मेहकर या तालुक्यातील काही गावांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या तालुक्यातील शेतकºयाना ठिबकचे अनुदान मिळवून देण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी कृषी सहाय्यकांंना हाताशी धरून गैरप्रकार केल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. दरम्यान, यासंदर्भात तक्रार प्राप्त झाली असून तक्रारीच्या अनुषंगाने निश्चितच चौकशी करण्यात येईल, असे ही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. कृषी सहाय्यकांना हाताशी धरून येथे झाला घोळबुलडाणा तालुक्यातील अजीसपूर, अंत्रीतेली, भडेगाव, भादोला, बोडेगाव, चांडोल, बारेखेड, दहिद बु. दहिद खुर्द, दालसावंगी, दिपूर, देऊळघाट, धाड, धामणगाव, गिर्डा, जांब, गुमणी, जांभरूण, नांद्राकोळी, रुईखेड, साखळी बु, सातगाव, सिंदखेड, शिरपूर या गावामध्ये अनेक शेतकºयांनी खोटी माहिती सादर करून शासनाची दिशाभूल करीत अनुदान लाटले आहे.४प्रतिष्ठीत लोकप्रतिनिधींच्या दबावाखाली, मेहकर तालुक्यातील अंजनी बु, अंत्री देशमुख, आलेगाव, भालेगाव, भोसा, बोरी, गाजरखेड, गवंढाळा, घोसर, जानेफळ, सुकळी, मेहकर, सुर्यापूर, उटी, वरवंड या गावातील अनेक शेतकºयांनी खोटी कागदपत्रे सादर करीत योजनेचा लाभ घेतला.४चिखली तालुक्यातील अमडापूर, अंचरवाडी, अंत्री कोळी, बाभूळगाव, बेरला, भालगाव, बानखेड, चंढाई, दसाळा, दहिगाव, डोंगर शेवळी, खोर, किन्ही नाईक, कुसुंबा, मालगी, सावरगाव डुकरे, सातगाव भुसारी, उंद्री, वैरागड व वरखेड या गावामधील काही शेतकºयांनी सुद्धा आॅफलाईनमध्ये लाभ घेतला असताना व तिन वर्षे झाली नसताना परत योजनेचा अनुदान लाटल्याचा प्रकार घडला आहे.
जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयात तक्रार प्राप्त झाली आहे. तक्रारीच्या अनुषंगाने निश्चित चौकशी करण्यात येईल.- नरेंद्र नाईक, जिल्हा अधिक्षककृषी अधिकारी, बुलडाणा.