लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : पंतप्रधान ठिबक सिंचन योजनेतील घोटाळ््याप्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक पावित्रा घेतला आहे. १९ डिसेंबररोजी कृषी अधिकारी सी.एन.पाटील यांना ठिबक संच भेट देत प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली. आठवडाभरात चौकशी करून दोषी अधिकाºयांवर कारवाई करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी दिला आहे. राज्यात सर्वत्रच राज्य शासनामार्फत प्रधानमंत्री ठिबक सिंचन योजना राबविण्यात आली. बुलडाणा जिल्हयात यामध्ये कृषी विभागाचे अधिकारी व ठिंबक संच विक्रेत्यांनी २०१२ ते २०१८ या कार्यकाळात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करून शासनाची दिशाभूल केली आहे. शेतकºयांचे आर्थीक उत्पन्न वाढावे यासाठी ठिबक सिंचन योजना राबवण्यात येत आहे. मात्र या योजनेचा खरा आर्थिक फायदा श्रीमंत शेतकºयांसह जिल्ह्यातील कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक, कर्मचारी, परवाना धारक ठिबक सिंचन संच विक्रेते यांनीच घेतला. खºया पात्र लाभार्थ्यांना डावलण्यात आले. जिल्ह्यातील तेराही तालुक्यात अनेक ठिकाणी बनावट लाभार्थी दाखवून योजनेचा लाभ लाटला. फोटोशिवाय अनेक प्रस्तावांना मंजूरात देण्यात आली. बनावट शेतकरी लाभार्थी हाताशी धरून शासनाची दिशाभूल केली. शासनाच्या अटी शर्थीचे उल्लंघन करीत आॅनलाईन व आॅफलाईन असे दोनदा तिनदा लाभ अनेकांना मिळवून दिला आहे. या सर्व प्रकाराची चौकशी करून भ्रष्ट कृषी अधिकारी, कर्मचारी तसेच ठिबक सिंचन विक्रेत्यांवर १० दिवसाच्या आत फौजदारी कारवाई करावी अशी मागणी केली आहे. शासनाच्या निधीवर मलिदा लाटण्याचा प्रयत्न करणाºया भ्रष्ट अधिकाºयांना धडा शिकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे प्रशांत डिक्कर यांनी सांगितले असून कारवाई न झाल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकरी हितासाठी लोकशाही मार्गाने जिल्हाभर तिव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे.
‘स्वाभिमानी’ने दिला कारवाईसाठी आठवड्याचा अल्टीमेटमठिबक सिंचन घोटाळ््याप्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी जाब विचारणार असल्याचे युवा जिल्हाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी सांगितले होते. मात्र जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक हे १९ डिसेंबररोजी जाणिवपूर्वक कार्यालयात अनुपस्थित राहिले. जिल्हयातील ठिबक सिंचन घोटाळ््याबाबत कृषी अधिकारी सी.एन.पाटील यांच्याशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, युवा जिल्हाध्यक्ष प्रशांत डिक्कर, जळगाव जामोद विधानसभा संपर्क प्रमुख मोहन पाटील यांनी चर्चा केली. यावेळी रोशन देशमुख, राणा चंदन, कार्तीक खेडेकर, पवनकुमार देशमुख, रफिक शेख करिम, लवेश उबरहांडे, दत्ता जेऊघाले, ज्ञानेश्वर कल्याणकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.