शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

मुंबई, पुणे ड्युटी नको रे बाबा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 11:36 AM

Drivers says No to Pune, Mumbai duty : मुंबई, पुणे ड्युटी नको रे बाबा, अशी विनवणी एसटी बसचे चालक व वाहक करताना दिसून येत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : गेल्या वर्षी मुंबई व पुणे शहरासह सर्वच महानगरांमध्ये कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळाला. आता गेल्या काही दिवसांपासून ही परिस्थिती पुन्हा निर्माण होत आहे. यामुळे मुंबई, पुणे ड्युटी नको रे बाबा, अशी विनवणी एसटी बसचे चालक व वाहक करताना दिसून येत आहेत.कोरोना संसर्गामुळे गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून तब्बल सहा महिने एसटी बसची प्रवासी वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर कोरोनाचा प्रभाव हळूहळू कमी होत गेल्याने ऑगस्ट २०२० पासून एसटीची चाके पुन्हा एकदा फिरायला लागली. सुरुवातीला जिल्हांतर्गत वाहतुकीस परवानगी देण्यात आली. यानंतर लांबपल्ल्याच्या ठरावीक बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या. कालांतराने प्रवाशांचा कल वाढल्याने एसटी बसची वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आली. यामुळे साहजिकच चालक व वाहकांच्या ड्युटी महानगरांपर्यंत धावणाऱ्या शहरांकडे लावण्यात आल्या. सुरुवातीच्या काळात त्यांनी ही जबाबदारी निमूटपणे स्वीकारली. मात्र आता पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढल्याने पुणे, मुंबईची ड्युटी म्हटली की नको रे बाबा, असे शब्द आपसूकच चालक व वाहकांमधून व्यक्त होतात. 

एसटी चालक व वाहकांना पुणे, मुंबईची ड्युटी करताना कुटुंबाची काळजी सतावत असते. सध्या कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असताना सतत प्रवाशांच्या संपर्कात असल्याने त्यांना कोरोनाची बाधा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकरिता सरकारने एसटी कामगारांच्या आरोग्य सुरक्षेच्या दृष्टीने व्यवस्था करावी व कर्मचारीबाधित झाल्यास उपचारांचा खर्च उचलावा.- प्रदीप गायकी, प्रदेश सचिव, महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेना

टॅग्स :buldhanaबुलडाणाstate transportएसटीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस