शहरं
Join us  
Trending Stories
1
सारे अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात, मुकेश अंबानींनी तर अमेरिकेतच पैसा ओतला... मोठी डील...
2
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
3
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
4
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
5
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
6
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
7
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
8
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
9
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
10
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
11
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
12
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
13
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
14
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
15
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
16
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
17
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
18
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
19
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
20
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम

दारू पिऊन वाहन चालविल्यास लायसन्स होऊ शकते रद्द!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 4:39 AM

वाहतूक नियमांचे पालन केल्यास अपघाताच्या घटनांवर नियंत्रण मिळविता येऊ शकते. अनेकजण वाहतूक नियमांचे पालन करण्याकडे दुर्लक्ष करतात. वाहतूक नियमांचे ...

वाहतूक नियमांचे पालन केल्यास अपघाताच्या घटनांवर नियंत्रण मिळविता येऊ शकते. अनेकजण वाहतूक नियमांचे पालन करण्याकडे दुर्लक्ष करतात. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध दंडात्मक कारवाई केली जाते; याशिवाय दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या, अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या चालकाचा परवानादेखील निलंबित केला जातो. संभाव्य कारवाई टाळण्यासाठी वाहतूक नियमांचे पालन करणे वाहनचालकांसाठी आवश्यक ठरत आहे.

हे नियम मोडल्यास लायसन्सचे निलंबन!

दारू पिऊन अथवा अमली पदार्थाचे सेवन करून वाहन चालविल्यास (ड्रंक ॲन्ड ड्राईव्ह) दंडात्मक कारवाई, तसेच लायसन्स निलंबित करण्याबाबत वाहतूक शाखेकडून आरटीओकडे प्रस्ताव सादर केला जातो.

एखाद्या चालकाकडून अपघाताची घटना घडल्यास या प्रकरणातही चालक परवाना निलंबित करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात येतो. तीन महिने किंवा काही घटनांमध्ये अधिक कालावधीसाठी परवाना निलंबित होऊ शकतो.

अशी होते कारवाई...

वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या चालकाविरुद्ध परवाना निलंबनाच्या कारवाईचा प्रस्ताव वाहतूक पोलीस शाखेकडून आरटीओकडे पाठविण्यात येतो. मोटार वाहन अधिनियमातील तरतुदीनुसार आरटीओकडून विहित कालावधीसाठी परवाना निलंबनाची कारवाई करून वाहतूक शाखेकडे फाईल पाठविली जाते.

चार वर्षांतील कारवाई...

२०१८ ६२

२०१९ २००

२०२० ६०

२०२१ ४५

प्रत्येकाने वाहतूक नियमांचे पालन करावे

रस्ते अपघाताच्या घटनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रत्येकाने वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. वाहतूक नियम न पाळणाऱ्या चालकाविरुद्ध वाहतूक शाखेतर्फे दंडात्मक कारवाई केली जात आहे. ड्रंक ॲन्ड ड्राईव्ह, अपघात अशा घटनांतील चालक परवाना निलंबित करण्याबाबत आरटीओकडे प्रस्ताव पाठविला जातो. चालू वर्षात असे दोन प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत.

- गोपाल वरोकार,

प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी, बुलडाणा.