- देवेंद्र ठाकरे लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: गत पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीपातील पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना दुष्काळी मदतीची घोषणा झाली. परंतु अद्यापही हजारो शेतकरी शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम मिळाली नसल्याचे दिसून येते. वाटप प्रक्रीयेत गती नसल्याने शेतकºयांना अनुदानाची प्रतीक्षा आहे.गत चार वर्षांपासून शेतकºयांना सतत कोरड्या दुष्काळाला सामोरे जावे लागले. त्यामुळे शेतकºयांची परिस्थिती दयनिय आहे. त्यातच गत पावसाळ्यात परतीच्या पावसामुळे पुन्हा भर पडली. शेतकºयांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावल्या गेला. नुकसानाचे प्रमाण प्रचंड असल्याने शासकीय स्तरावर वेगाने सुत्रे हलली.नुकसानाचे पंचनामे झाले, अहवालही सादर झाला आणि मदत जाहीर झाली. हेक्टरी ८ हजार रूपये याप्रमाणे दोन हेक्टरपर्यंत मदत जाही करण्यात आली. यातील पहिल्या टप्प्यातील मदतीचे वितरण झाले. दुसºया टप्प्यातील मदत वितरीत करणे सुरू आहे. परंतु या कामातील गती वाढताना दिसून येत नाही. बँकांमध्ये पैसे जमा करण्यात आले, असे महसूल विभागाकडून सांगण्यात येते. परंतु शेतकºयांच्या खात्यात रक्कम जमा झालेली नाही. दुसºया टप्प्यातील मदतीचेच वाटप पुर्ण झाले नसताना आणखी तिसरा टप्पा आणि त्याचे वितरण यात आणखी बराच काळ निघून जाणार असल्याचे दिसते. परिणामी शेतकºयांच्या संकटाच्या काळात मदत वेळेवर मिळत नसल्याची परिस्थिती आहे.दरम्यान गतवर्षी पावसाअभावी खरीप तसेच रब्बीचा हंगामही हातून गेला. त्यामुळे उत्पादन झाले नाही. परिणामी शासनाने दुष्काळी मदत जाहीर केली. परंतु ती मदतही अद्यापही शेकडो शेतकºयांच्या खात्यात जमा झाली नसल्याची परिस्थिती आहे. पिक विम्याचेही तेच झाले. अनेक शेतकºयांना पिक विम्याचा लाभ मिळाला नाही. काही शेतकºयांच्या खात्यात जमा झालेली रक्कम तर हास्यास्पद आहे. दुष्काळ निधी, पिक विम्यानंतर प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचेही तेच होत आहे.योजनेसाठी पात्र शेतकºयांच्या खात्यात वर्षभरात ६ हजार रूपये या योजनेद्वारे जमा करण्यात येणार आहेत. परंतु वस्तुस्थिती गंभीर आहे. काही शेतकºयांच्या खात्यात आतापर्यंत ४ हजार रूपये, काहींच्या खात्यात केवळ २ हजार रूपये तर काही शेतकºयांच्या खात्यात एकही रूपया अद्याप जमा करण्यात आला नाही.एकीकडे शेतकºयांच्या खात्यात मदत जमा करण्याची ही परिस्थिती असताना, आता सध्याच्या ओल्या दुष्काळाची मदतही संथगतीने वाटप करण्यात येत आहे.
दुष्काळी अनुदान वितरणाचे काम संथगतीने!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 3:01 PM