लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: पत्नीस बाहेरगावी सोडण्यासाठी बसस्थानकावर आलेल्या मद्यपीने बुलडाणा बसस्थानकावर जवळापस दोन तास गोंधळ घातला. चौकशी कक्षाची काच फोडली व संगणकही फेकून दिला. ही घटना १८ जुलै रोजी दुपारी घडली. दरम्यान या मद्यपीच्या गोंधळासमोर एसटी महामंळाचे कर्मचारी व पोलिसही बराच काळ हतबल झाले होते.शहरातील मिलींद नगर भागातील सुरेश अवसरमोल नामक व्यक्ती त्याच्या पत्नीला बाहेरगावी सोडण्यासाठी बुलडाणा बसस्थानकावर आला होता. त्यावेळी पती-पत्नीमध्ये वाद झाला. तो सोडविण्यासाठी बसस्थानकावरील नागरिक दावले. मात्र वाद सोडविण्यासाठी गेलेल्या नागरिकांनाच अवसरमोल याने शिवीगाळ केली. यानंतर रागाच्या भरात जो दिसले त्याला त्याने शिवीगाळ करण्यास सुरूवात केली व चौकशी कक्षासमोरील काचांवर बुक्क्या मारून त्याने तेथील काच फोडली तसेच संगणकही फेकून दिले.त्यानंतर याप्रकाराची माहिती बुलडाणा शहर पोलिसांना देण्यात आली. पीएसआय सुधाकर गवारगुरूव काही पोलिस कर्मचारी बसस्थानकावर पोहोचले व त्यांनी मद्यपी अवसरमोलला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र तो कोणालच जुमानत नव्हता. चौकशी कक्ष तथा नियंत्रण कक्षासमोर उबारलेल्या रेलिंगमध्ये जात त्याने अधिकच कोंधळ केला. काही युवकांच्या मदतीने पोलिसांनी त्याला तेथून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पुन्हा तो तेथेच जाऊन बसला. त्यामुळे पोलिस कर्मचारी व एसटी महामंडळाचेही कर्मचारी हतबळ झाले होते. त्यानंतर त्याच्या भावास बोलावण्यात आले होते. दुपारी चार ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत हा गोंधळ सुरू होता.दरम्यान, या प्रकारात चौकशी कक्षातील संगणाकाचे व अन्य साहित्याचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे या प्रकरणी आता आगार प्रमुख प्रसंगी बुलडाणा शहर पोलिस ठाण्यात तक्रार देणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
बुलडाणा बसस्थानकावर मद्यपीचा गोंधळ, चौकशी कक्षाची काच फोडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 12:01 PM