राज्य शासनाने १४ एप्रिलपासून ‘ब्रेक द चेन’अंतर्गत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. तरीही विनाकारण कामाशिवाय नागरिक घराबाहेर पडत असतील, तर त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पोलीस प्रशासन व नगर प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाईसाठी भर उन्हात पोलीस रस्त्यावर, चौका-चौकात तैनात आहेत.
शहरात सकाळी ७ ते सकाळी ११ वाजेपर्यंत अत्यावश्यक आस्थापना सुरू आहेत. व्यापारीही प्रशासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करताना दिसून येत आहेत. तालुक्यात व शहरात वाढत चाललेली कोरोना रुग्णांची संख्या पाहता, प्रत्येक नागरिकांनी स्वयंशिस्त पाळणे हे आजच्या घडीला महत्त्वाचे आहे. अशीच रुग्णसंख्या वाढत राहिली, तर भविष्यात जीवितहानीचा संभाव्य धोका लक्षात घेऊन सर्व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करून सुधारित वेळमर्यादा पाळावी, विनाकारण घराबाहेर पडू नये, संचारबंदी नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.