बुलडाणा : मार्च महिन्याच्या सुरुवातीस हवामानात बदल होऊन सूर्याचे किरण लखलखू लागतात आणि उन्हाळ्याचे आगमन होते. बाष्पीभवनामुळे पाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे अनेक गावात टंचाईग्रस्त परिस्थिती निर्माण होते. यावेळी ग्रामस्थ मिळेल तेथून पाणी आणून गरज भागवित असतात. त्यामुळे अशा टंचाईग्रस्त १६६ गावपैकी अनेक गावात विविध आजार वाढले आहेत. जिल्ह्यात आजरोजी १८ गावात टँकरने पाणी पुरवठा सुरू असून त्यात बुलडाणा तालुक्यातील चौथा, चिखला, चिखली तालुक्यातील मेरा, चंदनपूर, रानअंत्री, देऊळगाव राजा तालुक्यातील धोत्रानंदई, राजनगाव, सरंबा, पाडळी शिंदे, मेहकर तालुक्यातील घाटबोरी, वरंवड, पाडळी, सिंदखेड राजा तालुक्यातील गोरेगाव, खामगाव तालुक्यातील जळकातेली, लांजूळ, खामगाव ग्रामीण, शेगाव तालुक्यातील चिंचोली व मोताळा तालुक्यातील गुगळी, कोल्ही गोल्हार या गावांचा समावेश आहे. याशिवाय जिल्ह्यातील १५० गावासाठी १४८ विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. ज्या टंचाईग्रस्त गावात टँकरने पाणी पुरवठा करण्यात येतो, अशी टँकर परिसरातील विविध खाजगी विहिरी किंवा तलावातून पाणी भरून पुरवठा करतात. काही विहिरी व तलावात अल्प पाणीसाठा असल्यामुळे दूषित पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यामुळे टंचाईग्रस्त गावातील ग्रामस्थ नाईलान्वये सदर दुषित पाणी पितात. तर ज्या गावासाठी विहिरी अधिगृहीत करण्यात आल्या आहेत. त्या विहिरीतून नियमित पाण्याचा उपसा होत असते. त्यामुळे अनेक विहिरीत परिसरातील नाल्याचे पाणी, कारखान्यातून निघालेली पाणी झिरपत या विहिरीत येत असते. याशिवाय विहिरीतील पाणी खोल गेल्यामुळे अनेक विहिरीत जमिनीखालील विविध रसायन असलेले पाणी झिरपत असते. असे पाणी ग्रामस्थ पित असल्यामुळे उन्हाळ्यात अपचन, उलट्या, जुलाब, डिसेन्ट्री आदी कारणामुळे पोटाच्या विविध समस्या निर्माण होतात. त्यामुळे टंचाईग्रस्त गावात शुध्द पिण्याचे पाणी मिळेल, अशी व्यवस्था करणे आवश्यक झाले आहे.
दूषित पाण्यामुळे बुलडाणा जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावात आजार वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 3:24 PM
बुलडाणा : मार्च महिन्याच्या सुरुवातीस हवामानात बदल होऊन सूर्याचे किरण लखलखू लागतात आणि उन्हाळ्याचे आगमन होते. बाष्पीभवनामुळे पाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे अनेक गावात टंचाईग्रस्त परिस्थिती निर्माण होते. यावेळी ग्रामस्थ मिळेल तेथून पाणी आणून गरज भागवित असतात. त्यामुळे अशा टंचाईग्रस्त १६६ गावपैकी अनेक गावात विविध आजार वाढले आहेत.
ठळक मुद्देटंचाईग्रस्त १६६ गावपैकी अनेक गावात विविध आजार वाढले आहेत.जिल्ह्यातील १५० गावासाठी १४८ विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. काही विहिरी व तलावात अल्प पाणीसाठा असल्यामुळे दूषित पाणी पुरवठा करण्यात येतो.