माेताळा शहरातील दुचाकी लंपास
माेताळा : शहरातील वाॅर्ड क्रमांक १५ मधील सर्वेश्वर नगरमधील एका घरासमोरून दुचाकी चोरी केल्याची घटना १८ जुलैच्या संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
शिक्षणाने सुसंस्कृतपणा विकसित हाेताे
मेहकर : माहिती आणि ज्ञान यातील फरक समजून घेऊन आपण ज्ञान मिळविण्यासाठी शिक्षण घ्यावे. शिक्षणामुळे सुसंस्कृतपणा विकसित होतो. त्यामुळे आपण आपली वाटचाल योग्य दिशेने करावी, असे प्रतिपादन एम. ई. एस. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ग. ना. परिहार यांनी केले.
मुसळधार पावसाने रस्ता गेला वाहून
चिखली : तालुक्यातील मेरा मंडळ अंतर्गत येत असलेल्या भरोसा शिवारामध्ये १५ जुलै रोजी मुसळधार पाऊस कोसळला. या पावसाने शिवारातील शेतात पाणी तुंबून पिके धोक्यात आली आहेत. नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
१५०० पशु पर्यवेक्षकांचा सहभाग
बुलडाणा : खासगी व सेवेतील पशु पर्यवेक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष झाले. विविध मागण्यांसाठी राज्यातील पशु पर्यवेक्षकांनी काम बंद आंदाेलन सुरू केले आहे. या आंदाेलनात जिल्ह्यातील १५०० खासगी व सेवेतील पर्यवेक्षकांनी सहभाग घेतला.
जिल्ह्यात कुष्ठराेग शाेध माेहीम
बुलडाणा : क्षयराेगाच्या संपूर्ण निर्मूलनासाठी तसेच कुष्ठराेगाची शाेध माेहीम राबवून संसर्ग साखळी खंडित करण्यासाठी जिल्ह्यात क्षय व कुष्ठराेग शाेध माेहीम राबविण्यात येत आहे. ४०० जणांचे पथक ३१ ऑक्टाेबरपर्यंत शाेध माेहीम राबविणार आहे.
नुकसानग्रस्त मदतीपासून वंचित
मेहकर : आमखेड परिसरात २८ जून राेजी झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे शेकडाे हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले हाेते. या भागातील नुकसानग्रस्तांना अजूनही मदत मिळालेली नाही. या नुकसानग्रस्तांना तातडीने मदत देण्याची मागणी हाेत आहे.