अशोक इंगळे। लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेडराजा: ‘आला पोळा सण झाले गोळा’ ही म्हण जुनीच. पोळा होताच घरमालकीण घर सारवून, पुसून स्वच्छ करते. कारण त्यांना ओढ लागली असते ती श्री गणेशाची! गणेश उत्सव काळातच गौरीचे आगमन होत असते. त्यामुळे बाजारपेठा सजलेल्या असतात; परंतु यावर्षी दुष्काळाचे सावट पसरल्याने बाजारपेठेत पाहिजे तशी गर्दी दिसून येत नाही. त्यामुळे सर्वत्र शुकशुकाट दिसून येतो.प्रत्येक कामाची सुरुवात आपण श्री गणेशाच्या पूजनाने करतो. त्यामुळे यशाचे, प्रगतीचे, बुद्धीचे गमक म्हणून त्याला पूजतो. श्री गणेशाचे आगमन गणेश चतुर्थीला होत असून, बाजारपेठेत तीन दिवसांपूर्वीच गणेश मूर्ती विक्रीसाठी आल्या आहेत; परंतु तीन दिवसात गणेश मूर्तीची पाहिजे तशी विक्री झाली नाही. शुक्रवारला साखरखेडर्य़ात आठवडी बाजार भरतो. बाजाराच्या दिवशी विक्री होण्याची अपेक्षा विक्रेत्यांना आहे. साखरखेडर्य़ात आठवडी बाजार ते बसस्थानक परिसरात २0 ते २५ दुकाने सजली आहेत. ५0 रुपयांपासून ५ हजार रुपयांपर्यंत मूर्ती विक्रीसाठी आलेली आहे. किराणा बाजारातही पाहिजे तशी गर्दी दिसत नाही. तरीही श्री गणेशाच्या आगमनाची प्रतीक्षा प्रत्येकालाच असते. दुष्काळाची कितीही मोठी झळ असली तरी पोटाला चिमटा बसला तरी चालेल; पण श्री गणेशाचे उत्सवात स्वागत करायचेच ही खुणगाठ बांधून प्रत्येक व्यक्ती तयारीला लागला आहे. सगळ्या संकटांचे विमोचन करणारा हाच विघ्नहर्ता असल्याने तो आलेल्या संकटाचे निश्चितच निवारण करेल, अशी भावना प्रत्येकाची असते. यावर्षी आगमन होताच प्रत्येक शेतकरी, मजूर, व्यापारी, छोटे-मोठे व्यावसायिक एकच प्रार्थना करणार आहे. ‘श्री गणेशा आमच्यावर वरुणराजाची कृपादृष्टी होऊ दे आणि येणारे संकट दूर होऊ दे.
दुष्काळी परिस्थितीमुळे गणेश उत्सवावर विरजण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 11:20 PM
सिंदखेडराजा: ‘आला पोळा सण झाले गोळा’ ही म्हण जुनीच. पोळा होताच घरमालकीण घर सारवून, पुसून स्वच्छ करते. कारण त्यांना ओढ लागली असते ती श्री गणेशाची! गणेश उत्सव काळातच गौरीचे आगमन होत असते. त्यामुळे बाजारपेठा सजलेल्या असतात; परंतु यावर्षी दुष्काळाचे सावट पसरल्याने बाजारपेठेत पाहिजे तशी गर्दी दिसून येत नाही. त्यामुळे सर्वत्र शुकशुकाट दिसून येतो.
ठळक मुद्देबाजारपेठेत शुकशुकाट अल्प पावसाचा परिणाम