मोताळा (जि. बुलडाणा): तालुक्यासह जिल्हय़ात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने या अवर्षण परिस्थितीचा फटका कृषी क्षेत्राला बसला आहे. त्यामुळे यावर्षी आंब्याच्या उत्पादनात मोठी घट निर्माण झाल्याने तालुक्यात आंब्याची आवक घटली आहे. यामुळे ग्राहकांना कैर्या व पिकलेले आंबे खरेदी करण्यासाठी अडीचपटीने पैसे मोजावे लागत आहे. दरवर्षी जून महिन्यात पावसाळय़ाच्या तोंडावर शहरासह ग्रामीण भागात लोणची घालण्याची लगबग सुरू होते. मात्र यावर्षी तालुक्यात एक महिना उशीरा पाऊस सुरू झाल्याने सद्या लोणचे घालण्याची लगबग सुरू झाल्याचे दिसून येत आहे. तालुक्यात मागील दोन वर्षापासून दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे याचा फटका आंबा उत्पादकांना बसल्याने जिल्हय़ासह परिसरात म्हणावे तसे आंबा उत्पादन झाले नाही. यावर्षी पावसाची सुरूवात अतिशय निराशाजनक झाल्याने गावरान आंब्याच्या कैर्या दृष्टीस पडल्या नाही. मात्र बाहेरच्या राज्यातून आलेले केसर, दशहरी, आम्रपाली, लंगडा, हापूस, बादाम, लालबाग, राजापुरी दिसला. लोणचे टाकण्यासाठीच्या कैर्यांची स्थितिही यापेक्षा वेगळी नाही. पावसाळा सुरू झाल्यामुळे आठवडी बाजारात कैर्या खरेदीसाठी महिलांसह ग्रामस्थांची लगबग सुरू झाली आहे. परंतु सद्या गावरान आंब्याच्या कैर्या बाजारात उपलब्ध नाही. या आंब्याचा भाव ५0 ते ६0 रूपये किलो आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे गावरान कैर्या परिसरात कुठेच उपलब्ध नाही. मात्र बाजारात इतर वाणाच्या परंतु आकाराने लहान असलेल्या कैर्या काही व्यापार्यांनी गावरान म्हणून ८0 रूपये किलो दराने विकतांना दिसत आहे.
पावसामुळे आंब्यांची आवक घटली
By admin | Published: July 05, 2016 12:59 AM