लोकमत न्यूज नेटवर्कधामणगावबढे: येथील एका शेतकर्याने कर्जाला कंटाळून आ त्महत्या केल्याची घटना १ ऑक्टोबर रोजी उघडकीस आली.मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे येथील येथील ६५ वर्षीय जगन्नाथ नथ्थु जाधव यांचेकडे ४ एकर शेत असुन सततची नापिकी व एक लाखा पयर्ंत असलेले कर्ज या विवंचनेत त्यांनी ३0 सप्टेंबराच्या रात्री घर सोडले. दरम्यान सकाळी घरात नसल्याने लक्षात आल्यामुळे मुले व नातेवाईकांनी दसरा सण असताना त्यांचा परिसरात शोध घेतला. दरम्यान दुसर्या दिवशी १ ऑक्टोबर रोजी पुन्हा शेतात शोध घेतला असता जगन्नाथ जाधव यांनी स्वत: चे शेतात निंबाचे झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास लावुन आत्महत्या केल्याचे नातेवाईक अमोल शहाणे यांना दिसले. याबाबत फिर्यादीवरून धामणगाव बढे पोलिसांनी आमस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
धा.बढे येथील शेतकर्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2017 1:18 AM
लोकमत न्यूज नेटवर्कधामणगावबढे: येथील एका शेतकर्याने कर्जाला कंटाळून आ त्महत्या केल्याची घटना १ ऑक्टोबर रोजी उघडकीस आली.मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे येथील येथील ६५ वर्षीय जगन्नाथ नथ्थु जाधव यांचेकडे ४ एकर शेत असुन सततची नापिकी व एक लाखा पयर्ंत असलेले कर्ज या विवंचनेत त्यांनी ३0 सप्टेंबराच्या रात्री घर सोडले. दरम्यान सकाळी ...
ठळक मुद्देझाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास लावुन आत्महत्याकर्जाला कंटाळून जीवनयात्रा संपविल्याची माहिती