शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती, मात्र समर्थकांना धक्कातंत्राची भीती
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
3
VI नंबर १, सन्मान कॅपिटल २, इंडियन ऑईल ३... ही अशी कोणती लिस्ट, ज्यात कोणालाही नकोय नाव?
4
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
5
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट
6
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
7
शिंदे म्हणतात, ‘लढाई’ जिंकली, पण ‘युद्ध’ बाकी; २५ तारखेच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?
8
मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा
9
सोनिया, राहुल, प्रियांका - संसदेत तिहेरी तोफ; संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एकत्र
10
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
11
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
12
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
13
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
14
मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक
15
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
16
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
17
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
18
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
19
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
20
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट

रिक्त पदांमुळे प्रसूती कक्ष बंद!

By admin | Published: June 01, 2017 12:42 AM

मोताळा : येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्यामुळे प्रसूती कक्ष बंद आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमोताळा : येथील ग्रामीण रुग्णालयावर तालुक्यातील जवळपास १०० खेडेगावातील ग्रामस्थांच्या आरोग्याची जबाबदारी आहे; मात्र येथे वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्यामुळे येथील प्रसूती कक्ष अद्यापही बंद आहे. त्यामुळे ग्रामीण गर्भवती महिला रुग्णांना प्रसूती व इतर उपचारासाठी बुलडाणा शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालय वा खासगी रुग्णालय गाठावे लागते.मोताळा येथे दहा वर्षांपूर्वी ग्रामीण रुग्णालयाची सुसज्ज इमारत बांधण्यात आली. यानंतर महिलांसाठीच्या शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या योजनानुसार महिला रुग्ण व गर्भवती महिला व नवजात बाळांसाठी विविध योजनेनुसार आरोग्य उपचार साधनसामग्री देण्यात आली; मात्र महिला वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्यामुळे या आधुनिक उपचार साधनांचा वापर बंद आहे. याचा परिणाम येथील ग्रामीण महिला रुग्णांना सोसावा लागत आहे. रुग्णालयात एमबीबीएस वर्ग १ ची तीन पदे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ १, परिचारिका १, कनिष्ठ लिपिक १, कक्षसेवक २ अशी पदे रिक्त आहे. यामुळे येथील परिचारिकांकडून शक्य होत असलेल्या प्रसूतीच रुग्णालयात करण्यात येतात, बऱ्याच वेळा गंभीर स्वरूपाचे महिला रुग्णांना ‘रेफर टू बुलडाणा’ करावे लागत आहे.बऱ्याच वेळा येथील प्रसूती कक्ष बंद ठेवण्यात येते, महिना दोन महिन्यातून एखाद्यावेळी कक्ष उघडा असतो. शासन एकीकडे गर्भवती महिलांसाठी अनेक सुविधा व योजना राबवित आहे. दुसरीकडे वैद्यकीय अधिकाऱ्यांअभावी येथील ग्रामीण महिलांना उपचारापासून दुरु राहावे लागत आहे. शिवाय येथील आरोग्य सेवा तोकडी असून, सुरक्षा भिंतीचे काम अर्धवट असल्यामुळे मोकाट गुरेढोरे व कुत्र्यांचा रुग्णांना नेहमी त्रास होतो.उपचार सुविधा बंदच...ग्रामीण रुग्णांना उच्चस्तरीय आरोग्य सुविधा मिळावी म्हणून शासनाकडून येथील ग्रामीण रुग्णालयाला विविध आरोग्य उपचार यंत्रसामग्री देण्यात आली आहे; मात्र ही यंत्रसामग्री हाताळण्यासाठी प्रशिक्षित कर्मचारी रुग्णालयात नसल्यामुळे ती बंद अवस्थेत झाकून ठेवण्यात आली आहे.