बुलडाणा: जिल्ह्यातील नळगंगा धरणाच्या भरवश्यावर अनेक शेतकºयांनी कांदा, मिरची व इतर भाजीपालावर्गीय पिकांची लागवड केलेली आहे. परंतू सध्या शेतकºयांना पाणी देणे बंद केल्याने नळगंगा धरणालगतचे कांदा, मिरची ही पिके धोक्यात सापडली आहेत. जिल्ह्यात दुष्काळ सदृश परिस्थिती असल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. तळणी, पिंपळपाटी, शेलापूर, पिंप्रीगवळी, काबरखेड, चिंचपूर, नळगंगा धरणपात्राजवळील शेतकºयांचे पीक अंतीम टप्प्यात आले असताना प्रशासनाकडून शेतकºयांना दिला जाणारा पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे या शेतकºयांचे कांदा, मिरची, तूर व इतर भाजीपालार्गीय पिकांना पाण्याची गरज भासत आहे. कांदा, मिरची व भाजापाला वर्गीय पिकांना एक पाणी मिळाले नाही, तर या पिकांचे मोठे नुकसान होऊ शकते. नळगंगा धरणातील गेल्या १० वर्षातील पाणी साठ्याचा विचार केल्यास जेम-तेम कमी जास्त पाणी आजपर्यंत या धरणात राहिले आहे. पिण्याच्या पाण्याव्यतिरिक्त १२ दलघमी एकूण साठ्यातून अल्पशा पाण्यावरती या शेतकºयांचे सुक्ष्म सिंचन असल्यामुळे कोणत्याचाही पाण्याचा अपव्यय न होता, चांगल्या प्रकारे पाणी पुरू शकेल असा दावा, परिसरातील शेतकºयांनी केला आहे.
जिल्हाधिकाºयांकडे शेतकºयांची धाव
सर्व नळगंगा उपसा सिंचन धारक शेतकºयांनी जिल्हाधिकाºयांकडे धाव घेऊन पीक अंतीम टप्प्यात असताना नळगंगा धरणाचे पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. २९ आॅक्टोबर रोजी शेकडो शेतकºयांच्या सह्याचे निवेदन यावेळी जिल्हाधिकारी डॉ. डांगे यांना देण्यात आले. या निवेदनावर राहुल झोपे, सागर नारखडे, बन्सीलाल राठी, रविंद्र सुपे, वसंत नारखेडे, श्रीकांत खर्चे, जनार्दन खर्चे, वसंत पाचपांडे, प्रभाकर खर्चे, निवृत्ती पाचपांडे, विष्णू नारखेडे, सोमा नाफडे यांच्यासह अनेक शेतकºयांच्या स्वाक्षºया आहेत.
पाटबंधारे विभागीय कार्यालयासमोर शेतकºयांची गर्दी
पाटबंधारे विभागाने महसूल विभागासोबत धरणातून अवैध पाणी उपसा करणाºयांवर कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. यावर्षी अत्यल्प प्रमाणात पाऊस झाल्यामुळे सर्वत्र अत्यल्प जलसाठा उपलब्ध आहे. त्यात करडी धरणामध्ये अवैध पाणी उपसा होत असल्याने पाटबंधारे विभाग व महसूल विभागाने काही शेतकºयांवर कारवाई केली. दरम्यान, सोमवारला सकाळी बुलडाणा येथील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयासमोर शेतकºयांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. यावेळी अनेक शेतकºयांनी कार्यकारी अभियंत्यांशी चर्चा केली.