बुलडाणा: कोरोना संसर्गाच्या काळात गरजेनुरूप अैाषध साठा जिल्ह्यासाठी उपलब्ध करताना मोठी तारेवरी कसरत करावी लागत आहे. अल्पसाठा, गरज असलेली अैाषधी उपलब्ध नसणे अशा स्थितीत अैाषधांची वाढलेली मागणी पुर्ण करण्यासाठी मोठी अडचण येत आहे. मात्र मुख्य अैाषध निर्माण अधिकारी म्हणून ३५ वर्षे झालेल्या सेवेतील अनुभव पणाला लावत जिल्ह्यासाठी गरजेनुरूप अैाषध पुरवठा उपलब्ध करण्याचे कसब जिल्हा सामान्य रुग्णालयातील मुख्य अैाषध निर्माण अधिकारी सतीष चोपडे यानी साधले आहे. त्यानुषंगाने त्यांच्याशी संवाद साधला असता गेली १५ महिने आपल्या आयुष्यातील अविस्मरीयन क्षण ठरले असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.
अैाषधांचा तुटवडा, रेमडेसिविर इंजेक्शनची अडचण ही स्थिती कशी हाताळली?
कोरोना संसर्गाच्या लाटेत अैाषधांची उपलब्धता कमी आहे. मात्र आरोग्य सेवेतील साडेतीन दशकाचा अनुभव व त्यातून निर्माण झालेेल्या संबंधांच्या आधारावर बुलडाणा जिल्ह्याला गरजेनुरूप अैाषधीसाठा उपलब्ध करण्यास आजपर्यंत तरी आपण यशस्वी झालो आहोत.
कोरोना काळात अैाषध खरेदी प्रक्रिया काहीशी किचकट झाली आहे का?
प्रक्रिया तशी किचकट नाही. मात्र तांत्रिक समितीसमोर गरज असलेली अैाषधी, साहित्य आणि रोज लागणारी नवनवीन अैाषधींची मागणी पाहता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षेतेखालील तांत्रिक समितीची मान्यता घ्यावी लागते. त्यानंतर दरकरार, टेंडर आणि जिल्हा नियोजन समितीची मान्यता या सर्व प्रक्रियेला ४५ दिवस लागतात. तोवर ग्रॅन्ड उपलब्धतेची समस्या निर्माण होते. ती उपलब्ध झाल्यास पुरवठादाराकडून अग्रीम रकमेची मागणी होती. ही सर्व प्रक्रिया मोठ्या जिकरीने पारपाडावी लागते.
सध्या आपल्याकडे अैाषधीसाठा उपलब्ध आहे का?
आपल्याकडे अैाषधींचा तुटवडा नाही. रेमडेसिविर इंजेक्शनही शासकीय रुग्णालयात गरजेनुरूप उपलब्ध आहेत. फॅबीपीरावीर टॅबलेटचीही अडचण नाही. उलटपक्षी जळगाव सह अकोला जिल्ह्ययाला आपतकालीन स्थितीत आपण मदत केली आहे. रॅपीट किट, आरटीपीसीआरची किट आपल्याकडे मुबलक प्रमाणत उपलब्ध आहे.
या धामधुमिक कुटुंबाला कितपत वेळ देता?
कोरोना संसर्गाच्या काळात गेली १५ महिने एक प्रकारे क्वारंटीनमध्येच जगावे लागत आहे. घरी गेलो तरी मुलांना जवळ घेता येत नाही. दिवसातील बहुतांश वेळ अैाषधांची जुळवाजुळव करण्यातच जातो. त्यातच दोन सहकारी व चतुर्थश्रेणी कर्मचारी येथे मदतीला आहे. परंतू उपलब्ध मनुष्यबळ हे गरजेपेक्षा खूपच कमी आहे.
कोरोना वगळता अन्य अैाषधींबाबतचा पुरवठा कसा आहे?
कोराना अैाषधी व्यतिरिक्त अन्य अैाषधांचा पुरवठा जिल्ह्यात सुरळीत आहे. उलटपक्षी हापकीनकडून कोरोना संदर्भातील अैाषधी तुलनेने कमी मिळत असून सध्या गरज नसलेल्या अैाषधींचा पुरवठा अधिक होत असल्याचे चित्र आहे.
आपल्या कामाबद्दल आपण समाधानी आहात का?
गेली १५ महिने फार धामधमुची गेली. आजही तिच स्थिती आहे. परंतू या संकटाच्या काळात जिल्ह्यासाठी अैाषध, सिलींडर व अन्य साहित्य उपलब्ध करण्यात आपण यशस्वी झालो. याचे समाधान आहे. प्रामाणिक पणे काम केले. पण कधीकधी कामकरताना काहीजणांकडून अकारण त्रासही झाला. मात्र आपल्या कामाबाबत आपण समाधानी आहोत.